विश्लेषण

"सीएए'च्या तप्त वादात राज्यसभेत आठवलेंची हास्ययात्रा...

मंगेश वैशंपायन

नवी दिल्ली : नागरिकत्व दुरूती कायदा (सीएए) हा विषय निघाला की भाजप व कॉंग्रेससह विरोधक यांच्यात वादाची ठिणगी पडते. मात्र याच मुद्यावरून राज्यसभेत आज झालेल्या एका काव्यमय भाषणाला मात्र दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी हशा व बाकांच्या गजरात दाद दिली. समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांचे ते भाषण "थांबवल्यावर' सभापती वेंकय्या नायडू यांनीही, ""मनोरंजन केल्याबद्दल तुमचे आभार' अशी टिप्पणी करताच सभागृह पुन्हा हास्यकल्लोळात बुडाले. 

आठवले संसदेत कवितेतच बोलतात आणि ते एकाच पक्षाचे एकच खासदार असल्याने राष्ट्रपती अभिभाषणावरच्या चर्चेत साधारणतः पंतप्रधानांच्या उत्तराआधी त्यांना बोलण्याची संधी मिळते. संसदीय गंभीरता न मानवणाऱ्या अनेक भाजप खासदारांनी तर त्यांना रामदास नव्हे कालिदास असेच म्हणण्यास सुरवात केली आहे. आज त्यांनी 
"" जर तुम्ही सीएएसारख्या चांगल्या कायद्याला पाठिंबा दिला नाहीत तर तुम्ही कायम विरोधी पक्षच रहाल '' असे भाकीत करताच कॉंग्रेस सदस्यही हसू लागले. 
आठवलेंच्या आजच्या कविता ः 
1) बहुत ही अच्छा था महामहिम रामनाथ कोविंद का अभिभाषण । 
क्‍योंकि नरेंद्र मोदी मजबूत कर रहे हैं भारत नेशन।' 
गुलाम नबी आजादजी, आनंद शर्माजी, 
अब मत लाओ उल्टा सीधा मोशन । 
अब जरा शांति से सुनो मेरा भाषण।। 
2) राष्ट्रपति जी का भाषण सुना, अच्छा था। 
आनंद शर्माजी का भी अच्छा था। 
हमारे विरोध में आप बहुत अच्छा बोलते हैं। 
बाद में हम लोग सब आपकी पोल खोलते हैं।' 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT