विश्लेषण

महाराष्ट्र सदन ते 11 सफदरजंग रोड : अखेर आठवलेंना मिळाला बंगला

सरकारनामा ब्युरो

मुंबई :  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना तीन वर्षाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर नवी दिल्लीत सरकारी निवासस्थान म्हणून 11 सफदरजंग येथे प्रशस्त बांगला मिळाला आहे . आता महिन्याभरात आठवले यांचा मुक्काम न्यू महाराष्ट्र सदन मधून या नव्या प्रशस्त बंगल्यात होणार आहे .

काँग्रेस सोबत युती तोडल्यानंतर काँग्रेस नेतृत्वातील यु पी ए सरकारने सन 2009 मध्ये 8 ए लोधी इस्टेट हा रामदास आठवलेंचा बंगला खाली करून त्यातील सर्व सामान रोड वर फेकण्याचा उद्दामपणा केला होता. काँग्रेस सरकार ने केलेला तो प्रकार  देशभरातील दलित बहुजनांच्या जिव्हारी लागला होता . काँग्रेसला सन 2014 पराभवाची धूळ चाखावी लागली. त्यानंतर  गतवर्षी सन 2016 मध्ये रामदास आठवले यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाचे राज्यमंत्री पदी नियुक्ती झाली . त्यानंतर वर्षभराने आता ना रामदास आठवले यांना सरकारी बांगला 11 सफदरजंग हा मिळाला आहे. मागील तीन वर्षात सरकारी बंगल्याविना महाराष्ट्र सदन मध्येच आठवलेंचा मुक्काम होता. आता हा मुक्काम महिन्याभरातच 11 सफदरजंग येथे हलविण्यात येणार असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले .

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT