विश्लेषण

रणजितसिंहांच्या हाती आला भाजपचा झेंडा

सरकारनामा ब्युरो

पुणे - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी अखरे आज कार्यकर्त्यांसह भाजपत प्रवेश केला. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी रणजितसिंहांच्या हाती भाजपचा झेंडा दिला आणि त्यांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश झाला. 

या वेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, सहकारमंत्री सुभाष देशमुख, सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख, शिक्षणमंत्री विनोद तावडे, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, सोलापूर भाजप जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांच्यासह मोहिते-पाटील कुटंबिय आणि निष्ठावंत उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT