chakankar-pawar
chakankar-pawar 
विश्लेषण

जेथे महिला सक्षम असतील तेथे महिलांना उमेदवारी मिळावी : चाकणकर

मुरलीधर कराळे

नगर : " राज्यात अनेक मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी आगामी विधानसभेसाठी उमेदवारी मागितली आहे .  या सर्व मागण्या पक्षाच्या वरीष्ठांपर्यंत पोहोचविण्यात येतील," असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी आज येथे सांगितले.

कर्जत-जामखेड जागेसाठी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मंजुषा गुंड इच्छूक  असून त्यांना उमेदवारी मिळावी यासाठी आपण प्रयत्न करणार का ? असा प्रश्न विचारला असता  रूपाली चाकणकर म्हणाल्या ," राज्यात अनेक मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी  उमेदवारी मागितली आहे .  या सर्व मागण्या पक्षाच्या वरीष्ठांपर्यंत पोहोचविण्यात येतील. जेथे महिला सक्षम असतील तेथे महिलांना उमेदवारी मिळावी असा आमचा प्रयत्न राहील . " 

पत्रकार परिषदेत बोलताना त्या म्हणाल्या, "नगर जिल्ह्यातील प्रश्न वेगळे आहेत. महिलांना अभय हवे आहे , सध्याच्या सरकारमधील नेते महिलांच्या प्रश्नावर विशेष जागरूक नाहीत, त्यामुळे आगामी काळात महिला संघटन अधिक वाढवून या प्रश्नावर प्रश्‍नावर लढावे लागेल."

दरम्यान, कर्जत-जामखेड जागे साठी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मंजुषा गुंड इच्छूक आहेत. त्यांनी मुलाखतही दिली आहे. याच जागेवर पक्षाचे युवानेते रोहित पवार हेही इच्छुक आहेत. त्यांनी ही मुलाखत दिली आहे. त्यामुळे ही उमेदवारी पवार यांनाच मिळण्याची शक्यता असतानाही मंजुषा गुंड यांनी मात्र ही मागणी केलेली आहे. उमेदवारी मिळण्याबाबत त्या ठाम आहेत. या पत्रकार परिषदेच्या वेळी मंजुषा गुंड उपस्थित होत्या. या मागणीबाबत त्यांच्यासोबत असलेल्या महिलांनीही ही या मागणीवर जोर दिला.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT