सदाभाऊ "कर्जमुक्‍त' ! शेट्टींबरोबरचा "तो' व्यवहार पुर्ण !
सदाभाऊ "कर्जमुक्‍त' ! शेट्टींबरोबरचा "तो' व्यवहार पुर्ण !  
विश्लेषण

सदाभाऊ "कर्जमुक्‍त' ! शेट्टींबरोबरचा "तो' व्यवहार पुर्ण ! 

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्याचे पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मंगळवारी सकाळी खासदार राजू शेट्टी यांच्या बॅंक खात्यामध्ये अडीच लाख रूपये जमा केले आहेत. खासदार राजू शेट्टी यांनी खोत यांचे वडील आजारी असताना त्यांना ही मदत केली होती. ही मदत परत करून सदाभाऊ आता एकप्रकारे "कर्जमुक्त' झाले आहेत. 

शेतकरी संघटनेतील वाद राजकीय पातळी सोडून भावनिक पातळीवर गेल्याने सदाभाऊ आणि राजू शेट्टी यांच्यातील आर्थिक मदत देण्याघेण्याचा विषय चव्हाट्यावर आला आहे. सदाभाऊ खोत यांचे वडील आजारी असताना राजू शेट्टी यांनी त्यांना केलेली आर्थिक मदत हा मुद्दा राजू शेट्टींच्या समर्थकांकडून सोशल मिडीयावर फिरविण्यात आला, या प्रकाराविषयी सदाभाऊ खोत यांनी नाराजी व्यक्त केली. ही रक्कम परत केल्याचे सदाभाऊ खोत यांनी पत्राच्या माध्यमातून राजू शेट्टी यांना कळविताना खरमरीत भाषेत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

राजू शेट्टी यांनी आपल्याला मदत केल्याचे आपणास मान्य असून ते आपण नाकारत नाही. मात्र त्या प्रकाराची ज्या पध्दतीने वाच्यता झाली, त्या प्रकाराने आपण व्यथित झालो असल्याचे सदाभाऊ खोत यांनी सरकारनामाशी बोलताना सांगितले. तो एक आर्थिक व्यवहार होता, आज तो पूर्ण झाला असल्याचे खोत यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT