नवी दिल्ली : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर डॅग्ज रॅकेटची पाळेमुळे खोदून काढण्यात मुंबईच्या अंमली पदार्थ विरोधी विभागाला (NCB) मोठं यश मिळालं आहे. यात महत्वाची भूमिका बजावलेले विभागाचे प्रमुख समीर वानखेडे यांचा केंद्रीय गृह मंत्रालयाकडून विशेष पदक देऊन सन्मान करण्यात आला आहे. त्यांच्यासह राज्यातील 11 पोलिस अधिकाऱ्यांनाही हे पदक देण्यात आलं आहे. (Sameer Wankhede get Home Ministers medal for excellence)
उत्कृष्ट तपास कार्य करणाऱ्या देशभरातल्या 152 पोलीस कर्मचारी-अधिकाऱ्यांना केंद्रीय गृह मंत्रालयातर्फे हे पदक देण्यात आलं आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील 11 अधिकाऱ्यांचा समावेश असून त्यात चार महिला अधिकारीही आहेत. एकूण पदकांमध्ये 'एनसीबी'च्या देशभरातील पाच अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यामध्ये वानखेडे यांचाही सन्मान करण्यात आला आहे. वानखेडे हे भारतीय महसूल सेवेतील 2008 च्या तुकडीचे अधिकारी आहेत.
अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासात ड्रग्ज कनेक्शन समोर आलं आहे. त्यानंतर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली एनसीबीने डॅग्जची पाळेमूळे खोदण्यास सुरूवात केली. यामध्ये अनेकांना अटक करण्यात आली असून त्यात बॉलीवूडसह अंडरवर्ल्डचं कनेक्शनही समोर आलं आहे. या प्रकरणात बॉलीवूडत्या काही अभिनेत्री व अभिनेत्यांचीही चौकशी करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी छापेमारी करून मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.
दरम्यान, पोलिसांमध्ये तपास कार्याबद्दल उच्च व्यावसायिक दृष्टीकोन निर्माण व्हावा तसेच उत्तम तपास कार्य करणाऱ्या पोलिसांच्या कार्याची दखल घेतली जावी, या हेतूने 2018 साली केंद्र सरकारने हे पुरस्कार सुरू केले. ही पारितोषिके मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या एकूण 15 जणांचा समावेश आहे. तसेच महाराष्ट्र पोलीस दलातील 11, गोवा पोलिस दलातील 1 आणि गुजरातच्या पोलीस दलातील 6 अधिकाऱ्यांनी हे पदक मिळविले आहे.
तसेच या मानकऱ्यांमध्ये मध्य प्रदेशातील 11, उत्तर प्रदेशातील 10, केरळ आणि राजस्थानातील प्रत्येकी 9, तामिळनाडू पोलीस दलातील 8 आणि बिहारचे 7, कर्नाटक आणि दिल्ली पोलिसांतील प्रत्येकी 6 आणि इतर राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील पदकप्राप्त पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये 28 महिला पोलीस अधिकारी देखील समाविष्ट आहेत.
केंद्रीय गृह मंत्री पदकाने सन्मानित करण्यात आलेल्या महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांची नावे :
1. ममता लॉरेन्स डिसोझा, पोलिस निरीक्षक
2. पद्मजा अमोल बधे, सहायक पोलिस आयुक्त
3. अलका धीरज जाधव, सहायक पोलिस निरीक्षक
4. प्रिती प्रकाश टिपरे, सहायक पोलिस आयुक्त
5. राहुल धलसिंग बहूरे, सहायक पोलिस निरीक्षक
6. मनोहर नरसप्पा पाटील, पोलिस निरीक्षक
7. बाबूराव भाऊसो महामुनी, उपअधीक्षक
8. अजित राजाराम टिके, उपअधीक्षक
9. सुनिल शंकर शिंदे, पोलिस निरीक्षक
10. सुनिल देवीदास कडासने, पोलिस अधीक्षक
11. उमेश शंकर माने पाटील, उपअधीक्षक
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.