कर्जमाफीचे की मटक्‍याचे आकडे काढताय ? : अजित पवार 
कर्जमाफीचे की मटक्‍याचे आकडे काढताय ? : अजित पवार  
विश्लेषण

कर्जमाफीचे की मटक्‍याचे आकडे काढताय ? : अजित पवार 

सरकारनामा ब्युरो

सातारा : कर्जमाफीचा विचार आम्ही करत असून आमचे आकडे काढायचे काम सुरु असल्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील सांगत आहेत. आता मटक्‍याचे आकडे काढताय का ? असा सणसणीत टोला लगावत सामंजस्याने कर्जमाफीची मागणी करतोय, आत्ता पाझर फुटेल, मग फुटेल, पण ते पानवतच नाहीत. "आई जेवू घालेना, बाप भीक मागू देईना ' अशी अवस्था भाजप सरकारच्या कारकिर्दीत राज्यातील शेतकऱ्यांची झाली आहे, अशी टीका अजित पवार यांनी कऱ्हाडात केली. 

अजित पवार म्हणाले," शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांना वाचा फोडण्याचे काम संघर्ष यात्रेच्यानिमित्ताने करत आहोत. राज्यातील शेतकऱ्यांना कर्जबाजारी व्हावे लागते हे दुर्दैव
आहे. राजीव गांधी यांच्यानंतर 30 वर्षांनी नरेंद्र मोदींना पूर्ण बहुमत मिळाले. तीन वर्षात एकही प्रश्‍न त्यांनी सोडवला नाही. नोटाबंदी झाल्यानंतर अर्थव्यवस्थेळा बळकटी येईल, अतिरेकी कारवाया थांबतील, अशा घोषणा केल्या. मात्र, परिस्थिती बदलली नाही. लोकांना मोहिनी घालण्याचे काम करून ते मते घेतात आणि नंतर सर्व विसरून जातात. पेट्रोल, डिझेल, गॅसच्या किंमती वाढल्या, शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या उपसा सिंचन योजनांच्या वीज बिलात वाढ केली. हे अच्छे दिन आहेत का ? असा प्रश्‍न त्यांनी केला.

सरकारमधील मंत्री म्हणातात तुरीचे नियोजन चुकले. मग तुम्ही तेथे शेतकऱ्यांना मातीत घालायला बसलाय का? तूर विक्रीसाठी आली. त्यावेळी सरकारने खरेदी बंद केली. हे सरकार बेजबाबदार, असंवेदनशील, शेतकरी विरोधी सरकार आहे. जिल्हा बॅंकेत लाखो रुपयांच्या नोटा पडल्या आहेत. त्याचाही निर्णय नाही. सरकारला त्यासाठी योग्य भाषेत समजावावे लागेल. त्यासाठी संघर्ष अधिक तीव्र करावा लागणार असून त्यासाठी शेतकऱ्यांनी आम्हाला साथ द्यावी.' 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT