sanjay kakade challenges pankaja munde supporter
sanjay kakade challenges pankaja munde supporter 
विश्लेषण

मी परळीतही येईन: संजय काकडे

सरकारनामा ब्युरो

पुणे: धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला तर मी परळीत निवडणूक लढवून निवडून येईन, असे आव्हान राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी पंकजा मुंडे समर्थकांना दिले आहे.

काल परळीत गोपीनाथगडावर पंकजा मुंडे यांनी भाजपला इशारा देत राज्यभर दौरा करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यावर संजय काकडे यांनी टीका केली. पंकजा दौरा करून काय दिवे लावणार आहेत? अशी भाषा वापरत पंकजांचा प्रभाव मूठभर मतदारसंघात असल्याचे वक्तव्य केले. त्यामुळे परळी परिसरातील पंकजा समर्थक संतापले आणि त्यांनी काकडे यांना फोन करून यासंबंधाने जाब विचारला.

कृष्णा मुंडे या पंकजा समर्थकाने संजय काकडे यांना तुम्ही कुठून निवडून आलात आणि तुम्ही ताईंवर कां टीका करताय, असे प्रश्न विचारणारा फोन केला. त्यावर काकडे यांनी मी परळीतूनही निवडून येवू शकतो. धनंजयने राजीनामा दिला तर मी तिथे लढेन आणि जिंकून येईन. मी माझ्या भुमिकेशी ठाम आहे, असे सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT