Sanjay Raut latest news twitter/@sanjayRaut
विश्लेषण

संजय राऊतांच्या इशाऱ्यानंतर पळापळ... भाजपचे ते साडेतीन नेते कोण हे शोधण्यासाठी!

संजय राऊत (Sanjay Raut) यांचा पत्रकार परिषदेत मोठा गौप्यस्फोट करण्याचा इशाऱ्याने वातावरण तापले

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : शिवसेना नेते आणि `सामना` चे संपादक रोज कॅमेऱ्यासमोर भाजपवर टीका करतात. पण त्यांनी पहिल्यांदाच साडेतीन नेत्यांचा उल्लेख करत ते तुरुंगात जाणार असल्याचा इशारा दिल्याने राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. संजय राऊत यांनी हा आकडा असा का सांगितला, याचीही कारणे शोधण्यात येत आहे. ते तीन किंवा चार असे नेते अडकणार असल्याचे बोलू शकले असते पण साडेतीन हा असा स्पष्ट उल्लेख केल्याने आणखी खळबळ उडाली आहे.

या पत्रकार परिषदेपूर्वी शिवसेनेने वातावरण निर्मितीही चांगली केले आहे. दुसरे खासदार अनिल देसाई यांनीही सेनेचे सर्व खासदार या पत्रकार परिषदेला उपस्थित राहणार असल्याचे सांगत तिचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न केला. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना या पत्रकार परिषदेबद्दल विचारले असता त्यांनी `आता कुठे नाणेफेक झाली आहे, मॅच तर सुरू होऊ द्या,` असा सूचक इशारा दिला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी माझे कौतुक होत असल्याने काहींना मळमळ होत असल्याचे वाक्य उच्चारले होते. त्यांच्या आजारावर उपाय करण्याचेही त्यांनी सूचित केले होते. त्यामुळे शिवसेनेने या पत्रकार परिषदेची पूर्ण कसून तयारी केल्याचे दिसून येत आहे.

``शिवसेना आणी ठाकरे परिवारावर मागील काही दिवसांपासून चिखलफेक होत आहे. त्याला आम्ही उत्तर देऊच.पण हे सुद्धा सांगतो की भाजपचे साडेतीन लोक जेलमध्ये जाणार. "हमाम मे सब नंगे होते है. हे लक्षात असू द्या, असा घणाघात शिवसेनेचे संजय राऊत यांनी भाजपवर आज सकाळी केला. सेनाभवन येथे मंगळवारी सायंकाळी चार वाजता पत्रकार परिषद होणार आहे. शिवसेनेची पत्रकार परिषद होणार आहे,हे देखील राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
राऊत म्हणाले की, उद्या शिवसेना भवनात शिवसेनची पत्रकार परिषद होणार आहे. मी या पत्रकार परिषदेत असेलच पण शिवसेनेचे सर्व पदाधिकारी या पत्रकार परिषदेत असतील. शिवसेना आणि ठाकरे परिवारांवर जो काही चिखल उडवला जात आहे त्याला आम्ही उत्तर देऊ. हा जेलमध्ये जाईल, तो जेलमध्ये जाईल असं ते सांगत आहेत. अनिल देशमुखांच्या बाजूच्या कोठडीत जातील असेही वारंवार सांगितले जात आहे. पण तुम्हाला सांगतो, भाजपचे साडेतीन लोक देशमुखांच्याच बाजूच्या कोठडीत जाणार आहेत. देशमुख बाहेर असतील आणि भाजपचे लोक आत असतील.

ते पुढे म्हणाले की महाराष्ट्रातही सरकार आहे. हे लक्षात घ्यावे. ते शिवसेनेच्या नेतृत्वात आहे. सरकार हे सरकार असते. त्यामुळे ज्यांना आत टाकायचे आहे, त्याचा बंदोबस्त सुरू आहे. "हमाम में सब नंगे है". राजकारणात एक मर्यादा असते. तुम्ही ती ओलांडली आहे. सर्वांना माहीत आहे मी काय बोलतोय आणि कुणाबद्दल बोलत आहे ते. माझ्या बोलण्यामुळे त्यांची झोप उडाली आहे. आम्हाला धमक्या देऊ नका. आम्ही अशा धमक्यांना घाबरत नाही. मी तर नाहीच नाही. सरकारी एजन्सी आणि सरकारला जे उखडायचे ते उखडा, असा इशाराच त्यांनी यावेळी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT