विश्लेषण

संजय शिंदे पवारांचे नाही ऐकणार, रश्‍मी बागल टेन्शनमध्ये राहणार!

किरण चव्हाण

माढा (सोलापूर) : सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी करमाळा विधानसभा मतदारसंघातूनच निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट केले आहे. परिणामी राष्ट्रवादीच्या संभाव्य उमेदवार रश्‍मी बागल यांच्या अडचणी कायम राहणार आहेत. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कुर्डूवाडीतील दौऱ्यानंतर श्री. शिंदे माढा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याच्या वावडया उठल्या होत्या. त्याला संजय शिंदे यांच्या स्पष्टीकरणामुळे पुर्णविराम मिळाला आहे. तसेच माढा विधानसभा मतदारसंघातून आ. बबनराव शिंदे यांचे पुत्र, जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे यांचा मार्ग मोकळा झाला असल्याचे मानले जात आहे. श्री. शिंदे यांची फेसबुकवर म्हटले आहे की, 2019 ला करमाळा विधानसभा लढणार आहे. यात कोणत्याही परिस्थितीत कोणताही बदल होणार नाही .मी माढ्यातून आमदारकी लढवनार नाही, परंतु काहि विरोधक स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी अफवा पसरवत आहेत किंवा बातम्या येत आहेत . त्यावर कसलाच विश्वास न ठेवता कार्यकर्त्यांनी करमाळा -माढा विधानसभा निवडणुकीसाठी अधिक जोमाने तयारीला लागावे. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT