Priyanka Gandhi Sansad TV : वंदे मातरमला 150 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त संसदेच्या दोन्ही सभागृहात चर्चा झाली. लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तर राज्यसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी चर्चेला सुरूवात केली. दोन्ही सभागृहात सर्वच पक्षाच्या सदस्यांनी वंदे मातरम हा देशभक्तीचा आत्मा असल्याचे सांगतिले. त्याचप्रमाणे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये काही मुद्द्यांवरून जोरदार खडाजंगीही झाली.
‘संसद टीव्ही’च्या यू ट्यूबच्या चॅनेलवर दोन्ही सभागृहातील दैनंदिन कामकाज लाईव्ह दाखविले जाते. त्याचप्रमाणे सदस्यांच्या भाषणांचे व्हिडीओही या चॅनेलवर पोस्ट केले जातात. वंदे मातरमवरील भाषणांचे व्हिडीओही या चॅनेलवर उपलब्ध आहेत. या चॅनेलवर वंदे मातरमविषयीच्या भाषणांच्या सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या व्हिडीओमध्ये खासदार आगा सईद रुहुल्लाह मेहदी यांचा व्हिडीओ ठरला आहे.
मेहदी यांचा व्हिडीओला आतापर्यंत तब्बल १ लाख ४२ हजार लोकांनी पाहिले आहे. ही व्हिडीओ टॉपवर आहे. त्यानंतर सर्वाधिक काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी यांच्या भाषणाची सर्वाधिक चर्चा झाली. त्यांचा व्हिडीओ १ लाख १० हजार लोकांनी संसद टीव्हीवर पाहिला आहे. मेहदी यांच्या व्हिडीओला एवढ्या लोकांनी पाहण्यामागे त्यांचे एक वादग्रस्त विधान कारणीभूत ठरले आहे.
मेहदी हे जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे श्रीनगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. आपण वंदे मातरम गाणार नाही, असे वादग्रस्त विधान त्यांनी लोकसभेत केले होते. वंदे मातरम तुम्ही म्हणा, आम्हाला काहीच अडचण नाही. आम्ही त्याचा सन्मान करतो. पण ते गाण्यासाठी आम्हाला जबरदस्ती करू शकत नाही, असे सांगत मेहदी यांनी धार्मिक स्वातंत्र्याच्या अधिकारावर भाष्य केले. तसेच वंदे मातरमची सक्ती करण्यालाही जोरदार विरोध केला.
प्रियांका गांधी यांनी सभागृहात मोदींच्या भाषणावर जोरदार हल्ला चढवत त्यांचे मुद्दे खोडून काढले होते. त्यांनी हसत-हसतच सत्ताधारी बाकांवर बसलेल्या खासदारांच्या प्रत्येक प्रश्नाला प्रत्युत्तर दिले होते. मोदी जितकी वर्षे पंतप्रधान आहेत, तेवढी वर्षे तर पंडित नेहरू स्वातंत्र्यलढ्यात तुरुंगात होते, असे सांगत त्यांनी नेहरूंवरील टीकेला उत्तर दिले होते. नेहरू, काँग्रेसवर जितकी टीका करायची तेवढी करा, पण त्यानंतर महत्वाच्या मुद्द्यांवर बोला, असे आव्हानही त्यांनी सत्ताधाऱ्यांना दिले.
संसद टीव्हीच्या यू ट्यूब चॅनेलवर मोदींच्या व्हिडीओला आतापर्यंत केवळ १३ हजार लोकांनी पाहिले आहे. नेहरू आणि काँग्रेसने वंदे मातरमचे तुकडे केल्याचा, विश्वासघात केल्याचा आरोप मोदींनी केला होता. विशेष म्हणजे तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा, एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या व्हिडीओ पाहणाऱ्या लोकांची संख्या मोदींच्या भाषणाहून अधिक आहे. मोइत्रा यांच्या भाषणाचा व्हिडीओ तब्बल ८० हजार लोकांनी पाहिला आहे.
वंदे मातरमवरील नेत्यांचा भाषणांचे व्हिडीओ ‘संसद टीव्ही’च्या यू ट्यूब चॅनेलवर पाहिलेल्या लोकांची संख्या -
आगा सईद रुहुल्लाह मेहदी – १ लाख ४२ हजार
प्रियांका गांधी – १ लाख १० हजार
नरेंद्र मोदी – १३ हजार
महुआ मोइत्रा – ८० हजार
असदुद्दीन ओवेसी – ७८ हजार
अखिलेश यादव – ४० हजार
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.