विश्लेषण

शिवेंद्रसिंहराजे यांच्याजागी विक्रमसिंह पाटणकर येणार?

सरकारनामा ब्युरो

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारकीचा नुकताच राजीनामा देवून भाजप प्रवेश केलेल्या शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना जिल्हा बँक अध्यक्षपदावरून हटविण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. त्यांच्या जागी पाटणमधील राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांना संधी मिळू शकते. 

सातारा जिल्हा बँकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. पक्षाने शिवेंद्रसिंहराजेंना अध्यक्षपदाची संधी दिली होती. मात्र त्यांची भाजपप्रवेशाची चर्चा सुरू झाल्यानंतर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते दक्ष झाले होते. ज्यादिवशी शिवेंद्रसिंहराजे यांनी मुंबईत भाजपप्रवेश केला, त्याचदिवशी साताऱ्यात जिल्हा बँकेत रिक्त संचालकपदावर आमदार मकरंद पाटील यांची बिनविरोध झाली. बँकेचे अध्यक्ष उपस्थित नसताना संचालक मंडळाने ही निवड करून योग्य तो संदेश दिला आहे. 

काल शरद पवार यांना साताऱ्यातील पत्रकार परिषदेत यासंबंधाने प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी नव्या समीकरणांमुळे बँकेत काही अडचण नाही, असे पवारांनी शशिकांत शिंदे यांच्याकडे पाहत सांगितले होते. दरम्यान, पवारांच्या सातारा दौऱ्यात जिल्हा बँक अध्यक्ष बदलावर चर्चा झाली. आज पुण्यात झालेल्या बैठकीत हा विषय पवारांसमोर आला. त्यावेळी नवे अध्यक्ष म्हणून विक्रमसिंह पाटणकर यांचे नाव पुढे आले. माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्यासह अन्य एका नावाची चर्चा या बैठकीत झाली. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT