विश्लेषण

उदयनराजेंसाठी धोक्याची घंटा; प्रभावक्षेत्रातच झाले कमी मतदान!

सरकारनामा ब्युरो

सातारा : लोकसभेच्या पोटनिवडणुकीसह आठ विधानसभा निवडणुकीसाठी काल (सोमवारी) झालेल्या मतदानांची अंतिम आकडेवारी आज तब्बल 24 तासांनी उपलब्ध झाली आहे. विधानसभेसाठी 66.57 टक्के तर सातारा लोकसभेसाठी 67.15 टक्के मतदान झाले आहे. सर्वाधिक मतदान कऱ्हाड दक्षिण मतदारसंघात 71.44 टक्के तर सर्वात कमी मतदान साताऱ्यात 59.06 टक्के झाले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी दिली.

जिल्ह्यातील आठ विधानसभा आणि लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी 2978 मतदान केंद्रावर काल मतदान झाले. त्यांची संपूर्ण आकडेवारी आज जिल्हा प्रशासनाकडून उपलब्ध झाली आहे. याबाबतची माहिती देताना श्‍वेता सिंघल म्हणाल्या, महिलांचा मताचा टक्का पुरूषांपेक्षा कमी आहे. लोकसभेसाठी 67.15 टक्के मतदान झाले आहे. लोकसभेच्या एकुण 18 लाख 50 हजार 393 मतदारांपैकी 12 लाख 39 हजार 548 मतदारांनी मतदान केले. यामध्ये वाईत दोन लाख 26 हजार 242, कोरेगाव दोन लाख चार हजार 237, कऱ्हाड उत्तर एक लाख 98 हजार 778, कऱ्हाड दक्षिण दोन लाख आठ हजार 512, पाटणला दोन लाख तीन हजार 129, साताऱ्यात एक लाख 98 हजार 650 मतदारांनी मतदान केले. फलटण मतदारसंघात दोन लाख 31 हजार 790 तर माण मतदारसंघात दोन लाख 25 हजार 735 मतदारांनी मतदान केले.

विधानसभेच्या आठ मतदारसंघातील एकुण 25 लाख 22 हजार 289 मतदारांपैकी 16 लाख, 79 हजार 073 मतदारांनी मतदान केले. याची टक्केवारी 66.57 टक्के आहे. सर्वाधिक मतदान कऱ्हाड दक्षिण मतदारसंघात 71.44 टक्के तर सर्वात कमी मतदान सातारा विधानसभा मतदारसंघात 59.06 टक्के झाले आहे. कऱ्हाड दक्षिणेत वाढलेला मतांचा टक्का कोणाच्या पथ्यावर पडणार याची उत्सकता आहे.
 
विधानसभानिहाय मतदानाची टक्केवारी :
वाई : 68.26, कोरेगाव : 68.36, कऱ्हाड उत्तर 68.07, कऱ्हाड दक्षिण 71.44, पाटण : 67.73, सातारा : 59.06, फलटण : 64.46, माण : 66.35. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT