विश्लेषण

पुन्हा राजेशाही आणा, मग मी दाखवतो : उदयनराजे 

सरकारनामा ब्युरो

सातारा: बलात्काराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. लोकशाही नसती तर बलात्काराला गोळ्या घातल्या असत्या. आता एकच करा, पुन्हा  'राजेशाही' आणा मग मी दाखवतो काय करायचे, असे विधान साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केले. 

जिल्हा परिषदेच्या समोर एनआरएचएमच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनस्थळी खासदार उदयनराजे भोसले यांनी भेट दिली. यावेळी ते बोलत होते. 

ते म्हणाले, जनतेने निवडून दिलेले सदस्य, लोकप्रतिनिधी तुमचे प्रश्न मार्गी लावत नसतील तर काय उपयोग नाही. आरोग्य विभागात कर्मचारी नसल्याने मशनरी सडून गेल्या आहेत ही वस्तुस्थिती आहे. आज बलात्काराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. याला अपवाद तुम्ही मान्य केलेली लोकशाही आहे. लोकशाही नसती तर बलात्काऱ्याला गोळ्या घातल्या असत्या. आता एकच करा, पुन्हा  'राजेशाही' आणा मग मी दाखवतो काय करायचे ते. या वेळी माजी सभापती सुनील काटकर, संदीप शिंदे व कार्यकर्ते उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT