विश्लेषण

पुन्हा एकदा सावरकरांवरून वाद : कॉंग्रेसच्या मासिकातल्या लेखावरून भाजपचा शिवसेनेला सवाल

सरकारनामा ब्युरो

मुंबई : कॉंग्रेसचे मुखपत्र असलेल्या शिदोरी या मासिकात स्वातंत्र्यवीर सावरकरांवर ते देशद्रोही तसेच बलात्कारी असल्याचा लेख छापून आल्याने पुन्हा एकदा वाद सुरू झाला आहे. सावरकरांसारख्या महान देशभक्‍ताला ही दूषणे लावल्याबददल भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी कॉंग्रेसवर जोरदार आक्षेप घेतला असून सेना अशा पक्षाबरोबर काम कसे करते असा प्रश्‍न केला आहे. कॉंग्रेसप्रवक्‍ते सचिन सावंत यांनी सत्य तेच छापले आहे, आमचा सावरकर या व्यक्‍तीला विरोध नाही पण सत्य तेच सांगतो आहोत असा दावा केला आहे. 

कॉंग्रेसच्या "शिदोरी ' या मासिकाती माहिती समोर आल्यानंतर पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोप सुरू झाले. सावरकरांना देशद्रोही ठरवणाऱ्या कॉंग्रेस समवेत काम करणे शिवसेनेला कसे चालते, सत्तेसाठी काय काय सहन केले जाते अशी विचारणा भाजप नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. कॉंग्रेसने हे मासिक मागे घ्यावे किंवा राज्य सरकारने त्यावर बंदी घालावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. 

जे छापले त्यात काहीच गैर नाही असे सांगताना ते मागे घेण्याचा प्रश्‍न येतोच कुठे असा मुददा कॉंग्रेसने मांडला. शिवसेनेने मात्र यासंदर्भात कोणतेही विधान रात्री उशीरापर्यंत केले नव्हते. अधिवेशनात सावरकर गौरव ठराव मांडण्याच्या निमित्ताने कामकाज सल्लागार समितीच्या बैटकीत मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी हा विषय किती दिवस लावून धरणार असा प्रश्‍न केल्याचे सांगितले जाते आहे. उपमुख्यमंत्रीअजितदादा पवार यांनी मध्यस्थी करीत ठराव मांडायचा का नाही हा निर्णय अध्यक्षांवर सोडून दयावा असे सांगत वाद मिटवला होता. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT