Seven Union Ministers meets Vice President Venkaiah Naidu 
विश्लेषण

भाजपचे सात मंत्री उपराष्ट्रपतींना भेटले; अनिल देसाईंसह इतरांवर कारवाईचे संकेत

इतर खासदारांवरही धक्काबुक्कीचे आरोप केला आहे. त्यानंतर रविवारी सात केंद्रीय मंत्र्यांनी नायडू यांची भेट घेतली आहे.

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : राज्यसभेत मागील आठवड्यात झालेल्या गदारोळानंतर विरोधकांनी केंद्र सरकारवर टीका करत बाहेरून सभागृहात 40 हून अधिक जणांना आणल्याचा व महिला खासदारांवर हल्ला केल्याचा आरोप केला होता. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी मोदी सरकारमधील आठ केंद्रीय मंत्र्यांनी पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेत विरोधकांवर शरसंधान साधले होते. आता रविवारी सात मंत्र्यांनी उपराष्ट्रपतींची भेट घेत गदारोळ घालणाऱ्या खासदारांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. (Seven Union Ministers meets Vice President Venkaiah Naidu)

केंद्र सरकारकडून बुधवारी राज्यसभेत 127 व्या घटनादुरूस्तीचे विधेयक संमत झाल्यानंतर विमाविषयक विधेयक मंजुरीसाठी सादर करण्यात आले. त्यावर विरोधकांनी जोरदार आक्षेप घेत गोंधळ घालण्यास सुरूवात केली. विरोधक अधिकच आक्रमक झाल्यानंतर सभागृहात मार्शल बोलावण्यात आले होते. त्यानंतर या गोंधळात वाढच झाली. सभागृहाचे कामकाज स्थगित केल्यानंतर दोन्ही बाजूने आरोप-प्रत्यारोप करण्यात आले आहेत. 

त्यानंतर काही मार्शल्सनी उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांना निवेदन देत खासदारांवर कारवाईची मागणी केली होती. यामध्ये शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांच्यासह काही खासदारांनी मार्शल्सची सुरक्षा साखळी तोडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. तसेच इतर खासदारांवरही धक्काबुक्कीचे आरोप केला आहे. त्यानंतर रविवारी सात केंद्रीय मंत्र्यांनी नायडू यांची भेट घेतली आहे. त्यामुळे देसाई यांच्यासह इतर काही राज्यसभा खासदारांवर कारवाईचा निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

नायडू यांना भेटलेल्या सात मंत्र्यांमध्ये पियुष गोयल, प्रल्हाद जोशी, मुख्तार अब्बास नक्वी, धर्मेंद्र प्रधान, भूपेंद्र यादव, अर्जून राम मेघवाल आणि व्ही. मुरलीधरन यांचा समावेश होता. त्यांनी दिलेले कारवाईच्या मागणीचे निवेदन स्वीकारत नायडू यांनी संपूर्ण घटनेचा आढावा घेऊन कारवाईबाबतचा निर्णय घेतला जाईल, असं आश्वासन दिल्याचं समजतं. 

मागील आठवड्यात बोलताना गोयल म्हणाले होते की, विरोधी खासदारांनी महिला मार्शलला धक्काबुक्की केली. संसदीय लोकशाहीला काळीमा फासणारी ही घटना होती. बाहेरील व्यक्तींना कुणालाही सभागृहात आणण्यात आले नाही. त्यावेळी केवळ 30 मार्शल होते. त्यामध्ये 18 पुरूष व 12 महिलांचा समावेश होता, असंही गोयल यांनी स्पष्ट केलं. गोयल यांनी या प्रकाराच्या चौकशीचीही मागणी केली. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT