विश्लेषण

आमचे कार्यकर्ते बकरी आणण्यासाठी आटपाडीला गेले होते : शालिनीताई

सरकारनामा ब्युरो

सातारा : 'विधानसभेच्या निवडणुकीत माझा पराभव कऱण्यासाठी विरोधकांनी मतदारांना मटण, दारुच्या बाटल्या दिल्या. मात्र, ज्यांनी मटण खावून मतदान केले ते मटण बकऱ्याचेच होते का, असा मला प्रश्न पडला आहे', अशी टिप्पण्णी माजी आमदार शालिनीताई पाटील यांनी केली.

राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचे नाव न घेता त्या म्हणाल्या, 2009 च्या निवडणुकीत ज्यांनी मटण खावून मतदान केले ते मटण बकऱ्याचेच होते का, असा मला प्रश्न पडला आहे. एवढी बकरी आली तरी कुठून..?. आमच्या एका कार्यक्रमासाठी आठ ते दहा बकरी हवी होती तर ती आम्हाला मिळाली नाहीत. आमचे कार्यकर्ते त्यासाठी आटपाडीला गेले आणि तेथून बकरी आणली. त्यामुळे या लोकांनी खाल्लेल मटण बकऱ्याचेच होते का, असा विचार कधी कधी मनात येतो. या लोकांना सर्व काही मिळाले. मात्र, गोरगरीब मतदारांना काय मिळाले. आता जे आहेत त्यांना कोणी पर्याय देवू शकत नाही का..?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT