विश्लेषण

मध्यावधी निवडणुकांची अजिबात शक्यता नाही - शरद पवार

सरकारनामा ब्युरो

पुणे - राज्यात मध्यावधी निवडणुकांची अजिबात शक्यता नसल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज नागपुरात बोलताना स्पष्ट केले. 

शरद पवार सध्या नागपूर दौऱ्यावर आहेत. आज सकाळी पत्रकरांशी बोलताना त्यांना सांगितले, की आज नाही तर उद्या सत्तास्थापनेबाबत निर्णय होईल. त्यामुळे मध्यावधी निवडणुकांची अजिबात शक्यता नाही. कॉंग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेचे सरकार बनेल. हे सरकार पाच वर्षे चालेल, यावर आमच्या साऱ्यांचे लक्ष असेल. 

मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर बोलताना ते म्हणाले, की आमची बोलणी सुरू आहेत. त्यामुळे आताच कशाला कार्ड खुले करू?

महिला मुख्यमंत्री झाला तर आनंदच आहे. मात्र, हा विषय आमच्यासमोर आता नाही, असेही एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी नमूद केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT