Sharad Pawar Sarkarnama
विश्लेषण

Maharashtra Politic's : एखाद्याने विकेट दिली तर, ती घेतलीच पाहिजे ; पहाटेच्या शपथविधीवर शरद पवारांचा षटकार

गुगली कसा टाकायचा आणि कुठे टाकायचा, मी जरी क्रिकेट खेळलो नसलो तरी मला माहित होतं.

सरकारनामा ब्यूरो

Sharad Pawar News : पहाटेच्या शपथविधीवरून ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात पुन्हा जुगलबंदी रंगली आहे. फडणवीसांच्या आरोपाला उत्तर देताना पवारांनी पुन्हा एकदा षटकार मारला आहे. मी जरी क्रिकेट खेळलो नसलो तरी गुगली कसा आणि कोठे टाकायचा, हे मला माहित आहे. आता एखाद्याने विकेट दिलीच तर करायचं काय, ती विकेट घेतलीच पाहिजे, अशा शब्दांत फडणवीसांच्या बाऊन्सरवर शरद पवार यांनी षटकार ठोकला. (Sharad Pawar's Comment on Early Morning Oath Ceremony)

पवार (Sharad Pawar) म्हणाले की, त्या शपथविधीपूर्वी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आम्हाला भेटले, ही गोष्ट खरी आहे. त्यांच्याशी अनेक गोष्टींवर चर्चा झाली होती. पण, तो डाव होता की नाही, हे मला माहिती नाही. माझे सासरे सदू शिंदे हे देशातील उत्तम गुगली बॉलर होते. त्या गुगलीवर त्यांनी मोठमोठ्या लोकांच्या विकेट घेतल्या होत्या. मी आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष होतो. त्यामुळे गुगली कसा टाकायचा आणि कुठे टाकायचा, मी जरी क्रिकेट खेळलो नसलो तरी मला माहित होतं. आता यापेक्षा जास्त काही विचारू नका. आता एखाद्याने विकेट दिलीच तर करायचं काय, ती विकेट घेतलीच पाहिजे, अशी मिश्किल टिपण्णीही त्यांनी केली.

शरद पवार हे आमच्यासोबत डबलगेम खेळले, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यावर पवार म्हणले की, फडणवीस यांनी स्वतःच सांगितलं की पाठिंब्यासंबंधीचं धोरण दोन दिवसांनी मी बदललं. मी धोरण बदललं तर त्याच्या दोन दिवसांनंतर शपथ घ्यायचं काय कारण होतं. ती शपथ घ्यायची होती, तर ती अशी चोरून का घेतली पहाटे. आमचा त्यांना पाठिंबा होता, तर दोन दिवसांनंतर ते सरकार राहिलं का. दोन दिवसांत त्यांची सत्ता गेली आणि त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.

मी तुम्हाला उद्या सांगितलं, तुम्हाला गर्व्हनर करतो. तुम्ही शपथ घ्यायला याल का. त्या गोष्टीशी नरेंद्र मोदी यांचा संबंधच नव्हता. सत्तेशिवाय करमत नव्हतं, ते मोदी नव्हते. ते राज्यातील होते. माझ्याशी त्यांची भेट झाली होती. मी यापूर्वीही सांगितलं की, आम्ही अनेकदा भेटतो. आजही भेटतो. याचा अर्थ या गोष्टी नसतात. पण, आम्ही सत्तेसाठी किती अस्वस्थ आहोत, त्याशिवाय आम्ही पुढे जाऊ शकत नाही. जगू शकत नाही, ही फडणवीस यांची अस्वस्थता एकदा महाराष्ट्राच्या समोर आणण्याची आवश्यकता होती, असे बोचरे बाण पवारांनी फडणवीसांवर सोडले

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT