Shatrughn Sinha
Shatrughn Sinha  
विश्लेषण

शत्रुघ्न सिन्हा आता व्हीआयपी नाहीत !

वृत्तसंस्था

पाटणा :  भारतीय जनता पक्षाचे नेते आणि खासदार शत्रुघ्न सिन्हा यांना या पुढे पाटणा विमानतळावर व्हीआयपी ट्रीटमेंट मिळणार नाही.

पाटण्याच्या जयप्रकाश नारायण विमानतळाचे डायरेक्‍टर राजेंद्र सिंग लाहुरिया यांनी सांगितले की, "शत्रुघ्न सिन्हा यांना यापूर्वी विमानतळावर व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात असे. विमानतळावर त्यांची किंवा त्यांच्या सामानाची तपासणी होत नसे. पण आता शत्रुघ्न सिन्हा यांची नियमित तपासणी होईल.''

"शत्रुघ्न सिन्हा हे माजी केंद्रीय मंत्री आहेत. त्यांना त्यांची कार घेऊन विमानतळावरील धावपट्टीवर थेट विमानापर्यंत जाता येत असे. मात्र त्यांना व्हीआयपी दर्जा असल्याचे पत्र जून 2018 नंतर आलेले नाही. त्यांच्या व्हीआयपी दर्जाला मुदतवाढही देण्यात आलेली नाही त्यामुळे आम्ही हा निर्णय घेत आहोत, '' असे ही ते म्हणाले.

शत्रुघ्न सिन्हा हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपध्दतीवरील आपली नाराजी त्यांनी अनेकदा उघडपणे बोलून दाखवलेली आहे . त्यामुळे ते सध्या अडगळीत पडलेले नेते झाले आहेत . त्यांचे राजद नेते लालू प्रसाद यादव यांच्याशीही चांगले  संबंध  असून येत्या लोकसभा निवडणुकीत  शत्रुघ्न सिन्हा  काँग्रेस किंवा राजदचे उमेदवार असतील अशी बिहारच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे . 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT