विश्लेषण

`कविता म्हेत्रेंशी वाद नाही तर; देशमुखांविषयीची सल पवारांसमोर बाहेर पडली`

व्यंकटेश देशपांडे

फलटण : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या फलटण मधील कार्यक्रमात शेखर गोरे यांच्या कार्यकर्त्यांनी आज गोंधळ घातला. या गोंधळामागे राष्ट्रवादी अंतर्गत धुसफूस आणि श्रेयवाद दिसून आला.

माणमध्ये शेखर गोरेंच्या माध्यमातून राष्ट्रवादी सक्षम झाली. पण आता त्यांना डावलून माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांना पक्ष ताकत देत असल्याने कार्यकर्त्यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यापुढे आपली तिखट प्रतिकिया दिली. आता शेखर गोरेंबाबत पक्षातील नेते कोणती भूमिका घेणार याची उत्सुकता आहे.

फलटण येथे आज सकाळी झालेल्या माढा लोकसभा मतदारसंघातील संवाद कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या समोर माण तालुक्याची स्थिती व राजकीय आडाखे मांडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शेखर गोरे व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने आले होते. पण कार्यक्रमात  दुय्यम दर्जाच्या कार्यकर्त्यांना बोलण्याची संधी दिली जाते आहे. त्याचबरोबर नव्याने राजकारणात आलेल्या प्रभाकर देशमुख यांचा उदो उदो होताना दिसतो आहे.

या पार्श्वभूमीवर माणमध्ये राष्ट्रवादीचे नवे नेतृत्व उभे करण्याचा प्रयत्न होत आहे. मग आपले काय होणार, या एकाच विचारातून शेखर गोरे यांच्या मनात गेले कित्येक महिने निर्माण झालेली सल फलटण मधील संवाद कार्यक्रमात झालेल्या दंग्यातून दिसून आली.

माण- खटाव विधानसभा मतदार संघात सदाशिवराव पोळ यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करीत माणला विकासातून स्थैर्य प्राप्त करून दिले. त्यांना पर्याय म्हणून शेखर गोरे यांचा उदय झाला. गोरे यांनी तालुक्यातील नगर परिषद, नगरपंचायती, विकास सोसायट्या, स्थानिक स्वराज्य संस्था पवार यांचे नेतृत्व व मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीच्या झेंड्याखाली आणल्या. शरद पवार यांच्या विचारातून आपण सतत कार्यरत असल्याचा वारंवार उल्लेख शेखर गोरे करताना दिसतात.

तसेच विधान परिषदेच्या निवडणुकीत सर्वाधिक मते पक्षाकडे असूनही शेखर गोरे यांच्या पराभव झाला. त्यांच्या विजयासाठी झटण्याऐवजी राष्ट्रवादीचे नेते पतंगराव कदम यांच्या भावाच्या विजयासाठी पक्ष निष्ठा विसरले. त्याची सल गोरे याना आहे. आजच्या फलटणच्या कार्यक्रमात असा गोंधळ गोरे यांच्या समर्थकांनी का घातला, यामागे केवळ आपले नेतृत्व वरिष्ठ पातळीवरून डावलले जाणें आणि विधान परिषदेतील हार हेच कारणीभूत आहे.

खरेतर शरद पवार यांच्या उपस्थितीत होणार्‍या संवाद कार्यक्रमात गोरे समर्थक काही गोंधळ करतील अशी शंका येण्यासारखी परिस्थिती नव्हती पण त्यांना व्यासपीठावर बसण्यास सुरवातीला कोणी सांगितले नाही. तसेच त्यांच्यापेक्षा दुय्यम कार्यकर्त्याला बोलण्याची संधी दिली. त्यामुळे महिला आघाडी कार्याध्यक्षा कविता म्हेत्रे यांच्या भाषणावेळी गोरेंच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्यास सुरवात केली. मुळात म्हेत्रे व शेखर गोरे यांच्यात कोणताही वाद नसल्याचे सांगण्यात आले. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT