Not Certainty about MahaVikasAghadi In Palghar Zilla Parishad Election
Not Certainty about MahaVikasAghadi In Palghar Zilla Parishad Election 
विश्लेषण

पालघरमध्ये महाविकास आघाडीचे तळ्यात-मळ्यात

भगवान खैरनार

मोखाडा : पालघर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यामध्ये एकमत झालेले नाही. तर महाआघाडीत एकमत असुन त्यांच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. शिवसेनेने स्वबळावर उमेदवारी अर्ज दाखल करून लढण्याचे संकेत दिले आहेत. 

एकीकडे महाविकास आघाडी ची बोलणी सुरु असतांना, शिवसेनेने आपल्या उमेदवारांना पक्षाचे ए बी फॉर्म दिल्याने राज्यात उदयास आलेली महाविकास आघाडी पालघर जिल्हा परिषद निवडणुकीत होईल की नाही हे अजुनही तळ्यात - मळ्यात आहे.

राज्यात नव्याने उदयास आलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉग्रेस या महाविकास आघाडी ने राज्याचा राज्यकारभार सुरू केला आहे. तर राज्यात ज्या ठिकाणी भाजप चे वर्चस्व आहे, त्या ठिकाणी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडी करण्याचे आदेश पक्षश्रेष्ठींशी दिलेले आहेत. मात्र, पालघर जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेने स्वबळावर आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर काँग्रेस, राष्ट्रवादी, बहुजन विकास आघाडी आणि कम्युनिस्ट पक्ष या महाआघाडीनेही आपले उमेदवार रिंगणात ऊतरवुन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

पालघर जिल्हा परिषदेत 2014 च्या निवडणुकीत 21 जागा मिळविलेला भाजप मोठा पक्ष ठरला होता. त्यामुळे आता होऊ घातलेल्या निवडणुकीत, भाजपला शह देण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी, बहुजन विकास आघाडी, कॉग्रेस आणि कम्युनिस्ट पक्ष अशी महाविकास आघाडी होईल अशी अपेक्षा होती. शिवसेनेने आपल्या उमेदवारांना पक्षाचे अधिकृत ए बी फॉर्म दिल्याने शिवसेना स्वबळावर लढणार असल्याचे संकेत दिले आहेत. तर राष्ट्रवादी, बहुजन विकास आघाडी, कॉग्रेस आणि कम्युनिस्ट पक्ष यांनी आपली महाआघाडी कायम ठेवीत आपल्या ऊमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत महाविकास आघाडी होण्याची शक्‍यता मावळली आहे.

उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी 30 डिसेंबर पर्यंत मुदत आहे. त्यामुळे या काळात महाविकास आघाडी ची बोलणी यशस्वी झाल्यास, या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी दृष्टिपथात येण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

भाजप ला शह देण्यासाठी या निवडणुकीत महाविकास आघाडी करण्याबाबत शिवसेना नेते एकनाथ शिंदे, पालघर जिल्हा संपर्क प्रमुख आमदार रविंद्र फाटक यांच्याशी चर्चा सुरू आहे. एक - दोन दिवसांत या बाबत निर्णय होण्याची शक्‍यता आहे - सुनिल भुसारा, आमदार आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पालघर जिल्हाध्यक्ष.

शिवसेनेने आपले ऊमेदवार जाहीर करून त्यांनी ऊमेदवारी अर्ज देखील भरले आहेत. तसेच बहुतांश उमेदवारांना पक्षाचे ए बी फॉर्म ही दिले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी बाबत अजुन काही निर्णय झालेला नाही - राजेश शहा , शिवसेना पालघर जिल्हा प्रमुख.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT