Shivsena Palced Hoardings in Aurangabad about Loan Waiver
Shivsena Palced Hoardings in Aurangabad about Loan Waiver 
विश्लेषण

शेतकऱ्यांची कर्जमाफी करून दाखवली; शिवसेनेची पोस्टरबाजी

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय नुकताच घेतला. या कर्जमाफीचे श्रेय मात्र शिवसेना एकटीच घेत असून, बुधवारी शहरभर 'करून दाखविले' असे पोस्टर शिवसेनेतर्फे लावण्यात आले. या पोस्टरवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दोघांचेच छायाचित्र असून, कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते मात्र गायब असल्याने चर्चेला उधाण आले आहे.

मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना-भाजपचा वाद विकोपाला गेल्यानंतर राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीची स्थापना झाली व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री झाले. या सरकारचा किमान कार्यक्रमही ठरविण्यात आला. त्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय अग्रस्थानी होता.

नागपूर हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत कर्जमाफी देण्याची घोषणा केली. या निर्णयाचे शिवसैनिकांसह कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पेढे वाटून, फटाके फोडून स्वागतही केले. तर दुसरीकडे भाजपने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली होती त्याचे काय झाले? असा प्रश्‍न करून शिवसेनेवर टिकेचे बाण सोडले.

दरम्यान, आता कर्जमाफीचे श्रेय फक्त एकटी शिवसेनाच घेत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. सून, बाळासाहेब ठाकरे व उद्धव ठाकरे यांचे फोटो आहेत. कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षांच्या नेत्यांना मात्र या पोस्टरव स्थान देण्यात आलेले नाही.

या पोस्टरबाजी संदर्भात शिवसेनेचे आमदार तथा जिल्हाप्रमुख अंबादास दानवे म्हणाले, ''कर्जमाफीच्या ऐतिहासिक निर्णयानंतर शिवसेनेतर्फे शहरात पोस्टर लावण्यात आले आहेत. त्यामुळे इतर पक्षांच्या नेत्यांची छायाचित्र घेण्याचा प्रश्‍नच नाही. आघाडीतील इतर पक्षही असे पोस्टर लावू शकतात.'' आघाडी सरकारचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचे छायाचित्र त्यावर आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT