shivsena targets narendra modi over renaming khel ratna award 
विश्लेषण

पंतप्रधान मोदींमुळे मेजर ध्यानचंद यांना स्वर्गातही दु:ख झालं असेल!

देशातील क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार असलेल्या राजीव गांधीखेल रत्न पुरस्काराचे नामकरण करण्यात आता मेजर ध्यानचंद यांच्या नावाने करण्यात आलेआहे.

वृत्तसंस्था

मुंबई : देशातील क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार असलेल्या राजीव गांधी (Rajiv Gandhi) खेल रत्न पुरस्काराचे (Khel Ratna Award) नाव बदलण्यात आले आहे. मेजर ध्यानचंद (Major Dhyanchand) यांच्या नावाने आता हा पुरस्कार ओळखला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी या घेतलेल्या निर्णयावरुन गदारोळ सुरू असून, शिवसेनेने  (Shivsena) ही केवळ राजकीय गेम असल्याची टीका केली आहे. 

खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलणे ही लोकेच्छा नसून, राजकीय गेम आहे, असा टोला शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये म्हटले आहे. मोटेरातील सरदार पटेल स्टेडियमचे नाव बदलून नरेंद्र मोदी स्टेडियम करण्यात आले आहे. मोदी यांच्या नावाने अहमदबादमध्ये असलेल्या स्टेडियमच्या नामकरणाचा मुद्दाही सामनाने उपस्थित केला आहे. मोदींनी क्रिकेटमध्ये असे काय योगदान दिले आहे की, त्यांचे नाव या स्टेडियमला देण्यात आले आहे, असा सवालही करण्यात आला आहे. 

सामनामध्ये म्हटले आहे की, दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी हे दोघेही दहशतवादी कारवायांचे बळी ठरले होते. या नेत्यांबद्दल राजकीय मतभेद असू शकतात परंतु, त्यांनी देशाच्या विकासासाठी केलेल्या त्यागाचा उपहास करता येणार नाही, राजीव गांधींचे नाव काढून खेल रत्न पुरस्काराला मेजर ध्यानचंद यांचे नाव देणे हा राजकीय गेम आहे. राजीव गांधींच्या बलिदानाचा अपमान न करता मेजर ध्यानचंद यांचा गौरव करता आला असता. परंतु, देशाने आता असल्या परंपरा आणि संस्कृती हरवून टाकल्या आहेत. यामुळे ध्यानचंद यांनाही स्वर्गात दु:खी झाले असतील. 

भारताच्या पुरुष हॉकी संघाला तब्बल 41 वर्षांनंतर ऑलिंपिकमध्ये पदक मिळाले आहे. याचबरोबर भारताच्या महिला हॉकी संघाने उपांत्य फेरीपर्यंत धडक मारली होती. यामुळे भारताच्या महिला व पुरुष हॉकी संघाचे देशभरातून कौतुक होत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेल रत्न पुरस्काराला असलेले दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचे नाव काढून टाकले आहे. त्याऐवजी हॉकीचे जादूगार या टोपणनावाने ओळखले जाणार महान हॉकी खेळाडू मेजर ध्यानचंद यांचे नाव दिले आहे.  

मोदींनी ट्विटरवर म्हटले होते की, मेजर ध्यानचंद यांनी भारताला अनेक सन्मान मिळवून दिले. ते भारताच्या महान क्रीडापटूंपैकी एक आहेत. अनेकवेळा त्यांच्यामुळे भारताची मान गर्वाने उंचावली आहे. अनेक देशवासियांनी खेलरत्न पुरस्कार मेजर ध्यानचंद यांना समर्पित केला जावा, अशी मागणी केली होती. जनभावनेची कदर करुन आता खेलरत्न पुरस्काराचे नाव मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार करण्यात आले आहे. जय हिंद

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT