Balasaheb-Thakre 
विश्लेषण

बाळासाहेबांचा 'तुडवा' असा आदेश देणारा जुना व्हिडीओ व्हायरल

..

समीर सुर्वे

मुंबई :शिवसेनेतील आमदार संपर्कात असल्याचा दावा  भाजपच्या काही नेत्यांकडून   केला जात असताना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची जुनी क्‍लिप व्हायरल केली आहे.यात,शिवसेना सोडणाऱ्यांना कायद्याची पर्वाना करता तुडवा असा आदेश बाळासाहेब ठाकरे देत आहेत.

गेल्यावेळी 2014मध्ये  राष्ट्रवादीने भाजपला आधीच पाठिंबा देऊन शिवसेनेची पंचाईत केली होती . त्यावेळी कमी महत्वाची पदे पदरात पाडून शिवसेना सत्तेत सहभागी झाली.यंदा शिवसेनेने भाजपला कथित 50-50 च्या फॉर्म्युल्याची आठवण करुन देत मुख्यमंत्री पदावरही दावा सांगितला आहे.तर,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला मुख्यमंत्री पदाचे आश्‍वासन दिले नव्हते असे स्पष्ट केले.  शिवसेनेचे 56 पैकी 45 खासदार संपर्कात असल्याचा दावा भाजपचे खासदार संजय काकडे यांनी केला.

या सर्व घडमोडींमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा जुना व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओत बाळासाहेब त्यांच्या खास ठाकरी शैलीत पक्ष सोडून जाणाऱ्यांना रस्त्यावर आठवा करुन तुडवा असे आदेशच देत आहेत.त्याच बरोबर शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांचे कौतुक करत त्याच्या अंगावर काय काळबेर काय टाकायचे ते टाका असा आदेश देत आहे.शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी अनेक व्हाटऍप ग्रुपवर हा व्हिडीओ व्हायरल केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT