Rajni Patil, Sonia Gandhi sarkarnama
विश्लेषण

विलासरावांच्या निधनानंतर रजनी पाटलांना दिलेला शब्द सोनियांनी पाळला

पाटील यांनी एनएसयुआयमध्ये काम करताना एकदा राजीव गांधींना केज दौराही घडविला होता.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर रजनी पाटील (Rajni Patil) यांना राज्यसभेत काँग्रेस संधी दिली होती. तेंव्हा त्यांना आत्ता मिळालेली संधी पाच वर्षांची नसली तरी पुढे विचार करण्याचे आश्वासन दिले गेले होते. ते आता राजीव सातव यांच्या निधनानंतर कॉंग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी पूर्ण केले आहे. (Sonia Gandhi kept her word by nominating Rajni Patil for the Rajya Sabha seat)

राज्यसभेत कॉंग्रेसची बाजू योग्यरितीने मांडण्यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण किंवा संघटनात्मक बाजू सांभाळणारे मुकुल वासनिक यांच्या नावाला पसंती देणे अग्रक्रमावर होते. जी २३ समुदायातील सहभागामुळे पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव मागे पडले असावे, अशी चर्चा आहे. वासनिक यांच्यावरील संघटनात्मक जबाबदारी महत्वाची ठरली आहे. मिलिंद देवरा, संजय निरुपम यांनीही उमेदवारीची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, त्यांना संधी मिळू शकली नाही.

दरम्यान, रजनी पाटील यांनी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधींच्या काळात एनएसयुआयमध्ये काम करताना त्यांनी एकदा राजीव गांधींना केज दौराही घडविला होता. त्यावेळीच पहिल्यांदाच त्यांची सोनिया गांधींशी भेट आणि ओळख झाली. ‘एनएसयुआय' च्या राज्य आणि राष्ट्रीय सचिव, पुणे विद्यापीठाच्या सिनेट सदस्या, कॉंग्रेसच्या महाराष्ट्र कॉंग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा, खादी ग्रामोद्योग, महिला आर्थिक विकास महामंडळ आणि केंद्रीय समाज कल्याण बोर्डाच्या अध्यक्षपदाचा मानही त्यांना मिळालेला आहे.

राज्यसभेतील कामात काही चुक झाली का, या प्रश्नावर ‘तुमचे काम उत्तम आहे, मी, राहूल आणि पक्षाकडे त्याची नोंद असून भविष्यातही आम्ही तुमची काळजी घेऊ असे म्हणू ‘यु आर माय लॉयल सोल्जर’अशी शाबासकी देत त्यांच्या डोक्यावरुन आणि पाठीवरुन आपुलकीचा हात सोनियांनी फिरवला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT