विश्लेषण

रायगडाच्या संवर्धनासाठी 20 कोटी रुपये मंजूर

सरकारनामा ब्युरो

मुंबई : रायगडमधील शिवरायांच्या प्रकल्पासाठी म्हणजेच रायगडाच्या संवर्धनासाठी 20 कोटी रुपये सरकारने पहिल्याच बैठकीत मंजूर केले. तसेच शेतकऱ्यांसाठी आम्ही भरीम मदत करण्याचा आदेश मी प्रशासनाला दिला आहे असे राज्याचे मुखयमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. शेतकऱ्यांना भरीव मदत करण्याचा आमचा निर्धार आहे असेही त्यांनी सांगितले. हा संपूर्ण प्रकल्प 600 कोटींपेक्षा जास्त असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 

शिवतीर्थावर शपथविधी झाल्यावर उद्धव ठाकरे आणि त्यांचे सहा सहकारी सह्याद्री विश्रामगृहात मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीसाठी आले. राज्यात नव्याने स्थापन झालेल्या या तीन पक्षाच्या सरकारच्या पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीबद्दल जनतेमध्ये उत्सुकता होती. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT