विश्लेषण

नारायणआबांच्या पाठीशी सुभाषबापू उभे राहणार!

अण्णा काळे, करमाळा

आमदार नारायण पाटील आणि आपले संबंध 1998 च्या विधानपरिषद निवडणुकीपासुन आहेत. त्यावेळी मला आबांनी सहकार्य केले. मी सहकार्य करणाऱ्यांच्या उपकारातुन उतराई होणारा माणूस आहे. त्यामुळे यावेळी निश्चितपणे नारायण आबांच्या पाठीशी उभा रहणार असल्याचे प्रतिपादन सहकारमंत्री सुभाष देशमुख केले. 

देशमुख यांनी जेऊर (ता. करमाळा ) येथील आमदार नारायण पाटील यांच्या कार्यालयाला भेट दिली. आमदार नारायण पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, तालुकाध्यक्ष गणेश चिवटे, जयप्रकाश बिले उपस्थित होते. 

यावेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, आजपर्यंत पक्षाने जो आदेश दिला, त्याचे पालन केले. शरद पवार, सुशीलकुमार शिंदे यांच्या विरोधात लढलो. 2009 ला माढा मतदारसंघातून लढा दिला. नंतर तुळजापुरला पाठवले तिथेही निवडून आलो नाही, मात्र आता मंत्री झालोय, आहे तिथे बरं आहे. तिथेच सुखाने राहु द्या, मात्र पक्ष काय आदेश देईल त्याप्रमाणे होईल. सर्वांच्या दृष्टीने सुरक्षितता महत्वाची आहे, देश सुरक्षित तर आपण सुरक्षित आणि ते सुरक्षित ठेवण्याची धमक पतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आहे, त्यामुळे माढ्यातुन उमेदवार कुणीही असो नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी काम केले पाहिजे.


युती शासनाच्या काळात चांगली कामे झाली आहेत. करमाळा मतदारसंघातील रस्ते, वीज, पाणी हे प्रश्न सोडविण्यास शासनाची मोठी मदत झाली आहे. येणा-या लोकसभा निवडणुकीत शिवसेना पक्षप्रमुख जो आदेश देतील त्याप्रमाणे काम करून करमाळ्यातुन चांगले मताधिक्य दिले जाईल.
 -आमदार नारायण पाटील

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT