विश्लेषण

जीएसटीप्रकरणी भाजप शिवसेनेसमोर शरण

सरकारनामा

मुंबई : मुंबई महापालिकेला दरमहा करापोटी 8 टक्के रक्कम देण्यास अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अनुकूलता दर्शवली आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने राज्य सरकार निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्यानंतर शिवसेनेचा विरोध मावळल्याचे समजते. 

जीएसटी लागू केल्यानंतर मुंबई महापालिकेचा जकात कर रद्द होणार आहे. त्यातून मुंबई महापालिकेला 7 हजार कोटीचे महसूल उत्पन्न बुडणार आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेला तोटा होऊ नये तशी निधीची तरतूद करावी यासाठी शिवसेना अडून बसली होती. त्यासाठी अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी मातोश्रीवारी केली . दरवर्षी 4 टक्के कर देण्याचा सरकारचा प्रस्ताव होता. मात्र शिवसेनेच्या दबावामुळे 8 टक्के दरवाढ दिली जाणार आहे. 

20 मे ते 22 मे दरम्यान विशेष अधिवेशनमध्ये सत्तेतील मित्र पक्ष शिवसेना नाराज राहू नये याची काळजी मुनगंटीवार यांनी घेतली आहे. दरम्यान जीएस्टी म्हणजे काय त्यात कोणत्या गोष्टीचा समावेश केलेला आहे याची आमदाराना कळावी यासाठी विधीमंडळ सभागृहात प्रेझेंटेशन करण्यात आले. त्यातून मुनगंटीवार यांनी जीएसटी विधेयक मंजूर व्हावे यासाठी शिवसेनेची समजूत काढल्याने तीन दिवसीय अधिवेशन एका दिवसात गुंडाळण्याच्या दृष्टीने विचार सुरू असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.  

 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT