मुंबई : क्रूझ ड्रग्ज पार्टी (Cruise Drugs case) प्रकरणी अटकेत असलेल्या आर्यन खानसह (Aryan Khan) मुनमुन धमेचा आणि अरबाझ मर्चंट या तिघांना उच्च न्यायालयाने आज जामीन मंजूर केला. आर्यनला 3 ऑक्टोबरला अटक करण्यात आली होती. तेव्हापासून त्याची बहीण सुहानाने (Suhana Khan) सोशल मीडियात त्याविषयी काहीच प्रतिक्रिया दिलेली नव्हती. पण आर्यनला जामीन मिळताच केवळ तीन शब्दांत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
न्यायालयाकडून जामिनाचा आदेश मिळाल्यानंतर आर्यनची आज किंवा उद्या कारागृहातून सुटका होणार आहे. आर्यन खान जवळपास 25 दिवस तुरूंगात आहे. त्याला केवळ वडील शाहरुख खान एकदाच तुरूंगात भेटले आहेत. त्यामुळे सर्वचजण मन्नतवर आर्यनच्या घरी येण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. आर्यनची बहीण सुहाना ही सोशल मीडियात अॅक्टिव असते. पण आर्यनला अटक केल्यानंतर तिने इन्टाग्रामवर 8 ऑक्टोबरला आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारी पोस्ट टाकली होती.
त्यानंतर तिने थेट आर्यनला जामीन मिळाल्यानंतरच आर्यनसोबतचे लहानपणीचे चार फोटो शेअर केले. त्यामध्ये वडील शाहरुख खानसोबत ते दोघे खेळताना दिसत आहेत. त्याखाली सुहानाने 'आय लव्ह यू' या तीन शब्दांत आपली भावना व्यक्त केली आहे. अनेकांनी तिच्या या पोस्टवर कमेंट केल्या आहेत.
दरम्यान, आर्यन खानच्या वतीने माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी बाजू मांडली. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश नितीन सांबरे यांनी आर्यन, मुनमुन आणि अरबाझ या तिघांना जामीन मंजूर केला. उच्च न्यायालयाचा जामिनाचा आदेश मिळाल्यानंतर आर्यन याची कारागृहातून सुटका होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. जामिनाचा आदेश आज वेळेत कारागृहाला मिळाल्यास त्यांची आजच सुटका होईल. मात्र, याला विलंब झाल्यास त्यांची उद्या सुटका होऊ शकते.
अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाने (NCB) आर्यनला 3 ऑक्टोबरला पकडले होते. तो 8 ऑक्टोबरपासून आर्थर रोड कारागृहात आहे. मागील आठवड्यात सत्र न्यायालयात आर्यन खानच्या वतीने ज्येष्ठ वकील अमित देसाई व सतीश मानेशिंदे यांन बाजू मांडली होती. एनसीबीकडून अतिरिक्त सॉलिसीटर जनरल अनिलसिंह यानी बाजू मांडली होती. एनसीबीने आर्यनच्या व्हॉट्स अॅप चॅटची माहिती न्यायालयात सादर केली होती. तसेच काही जुन्या डॅग्ज प्रकरणांचा संदर्भही न्यायालयाला दिला होता. त्याचआधारे न्यायालयाने आर्यनचा जामीन फेटाळला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.