Sharad Pawar, sunil shelke, ajit  
विश्लेषण

Sunil Shelke News : आमदार शेळकेंच्या नथीतून 'साहेबां'चा अजितदादांवर निशाणा !

Political News : 'लेकी बोले, सुने लागे' या म्हणीनुसार प्रत्यक्षात अजितदादांवर टीका केली असल्याची चर्चा उपस्थितांत रंगली होती.

Uttam Kute

Pimpri News : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा संवाद मेळावा गुरुवारी (ता. ७ ) लोणावळा येथे झाला. त्यात शरद पवार यांनी माझ्या वाट्याला कुणी गेलं, तर सोडत नसतो, शरद पवार म्हणत्यात मला, असा कडक इशारा नाव न घेता अजित पवार यांचे कट्टर समर्थक स्थानिक आमदार मावळचे सुनील शेळके यांना दिला. पण, 'लेकी बोले, सुने लागे' या म्हणीनुसार प्रत्यक्षात तो अजितदादांनाच असल्याची चर्चा उपस्थितांत रंगली.

राष्ट्र्वादीत बंड करून अजितदादांनी पक्ष व पक्षाच्या निवडणूक चिन्हाचाही ताबा घेतला आहे. बहूतांश आमदार त्यांच्याकडे आहेत. त्या जोरावर आता ते शरद पवारांवर टीका करीत त्यांना आव्हान देऊ लागले आहेत. त्यातून त्यांनी शरद पवारांचे पाठीराखे शिरुरचे खासदार डॉ.अमोल कोल्हेंना आगामी लोकसभेला पराभूत करण्याचे चॅलेंज दिले आहे. त्याला प्रत्युत्तर अजित पवार यांचे समर्थक शेळकेंचा खरपूस समाचार घेत शरद पवार यांनी दिल्याची कुजबूज लोणावळ्यातील मेळाव्यात ऐकू आली. (Sunil Shelke News)

या मेळाव्याला येऊ नये म्हणून शेळकेंनी पक्ष कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना दम दिल्याच्या तक्रारीवर बोलताना एरव्ही अशी भाषा न करणाऱ्या साहेबांच्या तोंडी ती आल्याने उपस्थित कार्यकर्त्यांत ती चर्चेचा विषय झाली. दरम्यान, शेळकेंनी लगेच यावर खुलासा करूनही ही चर्चा थांबली नाही.

शेळके सगळ्यांच्याच निशाण्यावर

शरद पवारांपूर्वी बोललेले माजी मंत्री, मावळचे माजी आमदार मदन बाफना तसेच राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या निशाण्यावरही शेळकेच राहिले. शेळके हे अजित पवारांचे एवढं सांगतात, की जणूकाही ते राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून आहेत, अशी टीका शेख यांनी केली.

३०२ मध्ये (खूनाचा गुन्हा) शेळके यांचं नाव काय ते आलं, अन शेपूट घालून ते तिकडे (राज्यातील सत्तेत) गेले, असा टोला त्यांनी लगावला. पण, जशी पावडर खाऊन केलेली बॉडी, जमिन विकून आलेला पैसा राहत नाही, तसंच पवारसाहेबांना सोडून गेलेले राजकारणात टिकणार नाहीत, अशी भविष्यवाणी त्यांनी केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शरद पवारांचे नाव आणि कामामुळे ते निवडून आले

गतवेळी २०१९ च्या विधानसभेला मावळात भाजपचे बाळा भेगडेंचा (Bala Bhegde) ९० हजारांनी दणदणीत पराभव करताना त्यांच्याच पक्षातून आलेल्या शेळकेंना राष्ट्रवादीने निवडून आणले, याकडे बाफनांनी लक्ष वेधत ते शरद पवारांचे (Sharad Pawar) नाव आणि कामामुळे निवडून आल्याचे अधोरेखित केले.

(Edited By: Sachin Waghmare)

SCROLL FOR NEXT