विश्लेषण

राज्यात मध्यावधी निवडणुका झाल्यास आमची तयारी - सुनील तटकरे

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्यात सत्ताधारी पक्ष असलेल्या शिवसेनेकडून 25 जुलैनंतर राजकीय भूकंप येईल अशी वल्गना केली जात आहे, तर भाजपकडूनही मध्यावधी निवडणूकविषयी अधूनमधून बोलले जाते. यामुळे राज्यात मध्यावधी निवडणुका होणार असतील तर त्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसची तयारी आहे. मध्यावधी निवडणुकीत पक्ष मोठ्या ताकदीने उतरेल असा विश्वास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज व्यक्त केला. 

पक्षाकडून प्रत्येक राजकीय आव्हानाला सामोरे जाण्याची तयारी असून त्यासाठी आम्ही पक्ष बळकटीवर सर्वाधिक लक्ष देऊन आहोत.त्यासाठी प्रत्येक जिह्यातील पदाधिकारी, जिल्हा , तालुका प्रतिनिधीच्या सोबत बैठका घेतल्या जात आहेत. पावसाळी अधिवेशनपूर्वी विदर्भ वगळता राज्यातील सर्व जिह्याचे दौरे पूर्ण होतील अशी माहितीही तटकरे यांनी मुंबईत राष्ट्रवादी भवन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. 

शेतकरी कर्जमाफ़ीवर सरकारने काढलेली आदेशातील त्रुटीवरही त्यांनी आक्षेप घेतला. सरकारने यातून केवळ शाब्दीक कसरती केल्या आहेत. सरकारने लवकरात लवकर या त्रुटी भरून काढाव्यात अशी मागणीही त्यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी 40 लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे सांगितले असले त्यांच्या कर्जाची रक्कम खात्यात कशी जमा होणार आहे आणि महिन्याभरात ते पारदर्शकपणे केले जाईल याची माहिती द्यावी अशी मागणीही तटकरे यांनी केली. 

येत्या 7 ते 8 दिवसात किती शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला, बॅंकांचे कर्ज, सोसायट्याचे कर्ज आदेशाप्रमाणे दिले जात आहे की नाही, ते पहिले जावे, अशी मागणीही त्यांनी केली. अल्प मुदतीचे 10 हजार रुपयांचे पीककर्ज हे राज्यातील शेतकऱ्यांना मिळालेले नाही, त्यावरही तटकरे यांनी जोरदार आक्षेप घेतला 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT