Priyanka Chaturvedi - Sheetal Mhatre
Priyanka Chaturvedi - Sheetal Mhatre 
विश्लेषण

शिवसेना नगरसेविकेला ट्‌विटरवरून हत्येची धमकी

सरकारनामा ब्युरो

मुंबई : शिवसेना नगरसेविका शीतल म्हात्रे आणि प्रवक्‍त्या प्रियंका चतुर्वेदी यांना ट्विटरवरून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी एमएचबी कॉलनी पोलिसांनी आशिष केआर द्विवेदी या ट्‌विटर हॅंडलविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

आशिष द्विवेदी याने 'आशिषकेआरडीडब्ल्यू2' या ट्‌विटर अकांऊटवरून मंगळवारी सकाळी शीतल म्हात्रे आणि प्रियंका चतुर्वेदी यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी शीतल म्हात्रे यांनी बोरिवली येथील एमएचबी कॉलनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

शीतल म्हात्रे या दोन वेळा दहिसर परिसरातून नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत, तर प्रियंका चतुर्वेदी यांनी काही महिन्यांपूर्वी कॉंग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला आहे. आरे वसाहतीत प्रस्तावित मेट्रो कारशेडसाठी झाडे तोडली जात असताना त्या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT