विश्लेषण

आजपासून राम कदम झाले 'रावण' कदम  : नवाब मलिक

सरकारनामा

मुंबई  : घाटकोपर येथील दहीहंडीच्या कार्यक्रमात भाजप आमदार राम कदमांच्या रुपाने "रावणी' चेहरा समोर आल्याची जोरदार टिका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.

भाजप आमदार राम कदम यांनी दहीहंडीच्या कार्यक्रमात मुलींचे हरण करण्याची भाषा केल्यानंतर आज यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्यावतीने राम कदमांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. यावेळी मिडियाशी बोलताना नवाब मलिक यांनी राम कदमांचा खरपूस समाचार घेतला.

घाटकोपरमधील दहीहंडीच्या कार्यक्रमात भाजप आमदार राम कदम हे मुलींचे हरण करण्याची भाषा बोलतात. कुणाला कुठलीही मुलगी पसंत पडली तर त्या मुलींचे हरण करणार अशी भाषा वापरतात. त्यामुळे आजपासून राम कदम यांचे नामकरण रावण झालेले असून यापुढे ते रावण कदम म्हणून ओळखले जाणार असल्याची प्रतिक्रिया नवाब मलिक यांनी दिली. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT