ःसंग्राम जगताप
आमदार, नगर शहर
जन्म ः 12 जून 1985
पक्ष ः राष्ट्रवादी कॉंग्रेस
वडील ः आमदार अरुण जगताप (विधान परिषद) विधानसभेतील तरुण आमदार. आमदार संग्राम जगताप यांनी महाविद्यालयीन जीवनापासून युवकांचे नेतृत्त्व केले. विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविले. वडील अरुण जगताप माजी आमदार आहेत. संग्राम जगताप यांना राजकारणाचे बाळकडू घरातच मिळाले. महापौरपदाची संधी मिळाल्यानंतर नगरचा विकास करण्यासाठी त्यांनी विविध प्रयोग केले. आमदार शिवाजी कर्डिले हेही हे त्यांचे सासरे. जिल्ह्यातील मातब्बर नेते म्हणून त्यांचीही ओळख आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे त्यांना काही काळ निलंबितही करण्यात आले होते.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.