Samant-Rane 
विश्लेषण

'बोलबच्चन'ला 10 हजार मते क्रॉस करून देत नाही : उदय सामंत

एक ग्रामपंचायत सदस्य नाही, निघाले खासदार व्हायला. हेच पार्सल आता सिंधुदुर्गात परत पाठवतो. -उदय सामंत

राजेश शेळके

रत्नागिरी :  " अंगावर आल्यास शिंगावर घेण्याची कधीही तयारी आहे. या कोल्हेकुईंना आता घाबरत नाही. बोलबच्चनला 10 हजार मते क्रॉस करून देत नाही. मला वेंगुर्ल्यात एंट्री द्या, त्यांना सळो की पळो करतो, एक ग्रामपंचायत सदस्य नाही, निघाले खासदार व्हायला. हेच पार्सल आता सिंधुदुर्गात परत पाठवतो," असे सडेतोड प्रत्युत्तर ' म्हाडा'चे अध्यक्ष उदय सामंत यांनी नीलेश राणे यांना दिले.

हरचेरी येथील निर्धार मेळाव्यात ते बोलत होते. सामंत म्हणाले, " गर्दी पाहून लोकसभेला शिवसेनेचा विजय निश्‍चित झाला आहे. कोणत्या तरी खोमच्यात सभा घेऊन बोलण्यापेक्षा आता मैदानात या. प्रत्येक बैठकीत सेनेतील लोकांचा उद्धार करायचा आणि वडिलांनी त्यावर खुलासा करीत मी त्या वक्तव्याशी सहमत नाही, असे सांगायचे. आपल्या तोडीच्या माणसाला उत्तर द्यायचे असते. दीड लाखाने पडणाऱ्यांना काय उत्तर देणार? निवळीत ज्या कार्यकर्त्यांनी सभा घेतली त्या कार्यकर्त्यांचे आडनाव, नाव त्यांना घेता आले नाही. त्यांचा विनोद तेच करीत असतात. त्यामुळे बोलबच्चन असलेले हे पार्सल आता माझा शिवसैनिक सिंधुदुर्गात परत पाठविणार, हे निश्‍चित आहे."


"शिमग्यापूर्वी बोंबा मारणे हे एकच काम नीलेश राणे यांचे सुरू आहे. लज्जा उत्पन्न होईल, असे अपशब्द बोलणे त्यांना शोभत नाही. शिवसैनिक विनम्र आणि विनयशील आहे. याचा अर्थ त्यांना काही बोलता येत नाही, असा नाही. कोणती शिवसेना शाखा बंद आहे, ते जाहीर करा. आमच्या शाखा कायम उघड्या आहेत," असे उत्तर बाबू म्हाप यांनी दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT