pankja munde rally on gopinath gad
pankja munde rally on gopinath gad 
विश्लेषण

उद्धव ठाकरे सहकुटुंब गोपीनाथ गडावर : पंकजा मुंडेंचा उद्याच शिवसेना प्रवेश?

गणेश कोरे

पुणे : मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा पहिलाच दौरा शिवनेरीवर होणार आहे. शिवनेरी नंतर ठाकरे घराण्याचे कुलदैवत असलेल्या एकविरा देवीच्या दर्शन घेऊऩ मुख्यमंत्री थेट गोपीनाथगडावर जाणार आहेत. ठाकरे यांच्या गोपीनाथ गडावरील उपस्थितीमुळे राज्यात नवी राजकीय समीकरणे उदयास येण्याची शक्यता आहे. यानिमित्ताने पंकजा मुंडेचा शिवसेना प्रवेश होणार कि त्या भाजपामध्येच राहणार या चर्चांना उधाण आले आहे. 

पंकजा मुंडे यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्याने त्या नाराज असल्याचे चित्र आहे. पक्षाच्या कोअर कमिट्यांच्या बैठकांना त्याची गैरहजेरी नाराजीच्या चर्चांना खतपाणी घालत आहेत. दरम्यान भाजपचे बहुजन चेहेरा असलेले दिवंगत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीचा भव्य कार्यक्रमाचे आयोजन गोपीनाथ गडावर गुरुवारी( ता.12) होत आहे. या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे सहकुटूंब जाणाऱ असल्याची माहिती आहे. यामध्ये रश्मी ठाकरे, आमदार आदित्य आणि तेजस ठाकरे असणार आहेेत.

ठाकरे आणि मुंडे परिवाराचे ऋणानुबंध जगजाहीर आहेत. या परिवारातील स्नेहाचा ओलावा गोपीनाथ मुंडे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतरही कायम आहे. या स्नेहाच्या संबधांमुळे उद्धव ठाकरे सहकुटुंब गोपीनाथ गडावर जाणार असल्याची खात्रीशीर माहिती `सरकारनामा`ला मिळाली आहे.

दरम्यान खासदार प्रितम मुंडे यांनी बुधवारी (ता.10)  गोपीनाथ गडावर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखती मध्ये "उद्या तुम्हीच पहा काय होईल ते" असे म्हणत सस्पेन्स कायम ठेवला आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT