विश्लेषण

मुनगंटीवारांना उद्धव ठाकरेंनी भेट नाकारली 

सरकारनामा ब्युरो

मुंबई : भाजपचे नेते आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना भेटण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नकार दिला आहे. मुनगंटीवार यांनी त्यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितली होती. मात्र उद्धववेळ दिली नसल्याचे समजते. ही भेट नाकारल्यामुळे शिवसेना आणि भाजप युतीची चर्चा लांबणीवर पडल्याचे समजले जाते. 

भविष्यात भाजपशी कुठलीही युती करणार नाही,असे शिवसेनेने यापूर्वीच जाहीर केले होते. तरीही युती होईल असा विश्वास भाजप नेत्यांना आजही वाटतो आहे. 2014 मध्ये भाजपने दिलेली वागणूक शिवसेना अद्याप विसरलेली नाही. सत्तेत सहभागी असून शिवसेना भाजप सरकारवर कायमच हल्ले चढवित आहे. भाजपने आमचा मुका घेतला तरी, आता युती होणार नाही, असे वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. 

कथुआप्रकरण, यूपीतील भाजपचे बलात्कारप्रकरण, जातीयद्वेष यामुळे देशात आणि राज्यात निर्माण झालेले एकंदरीत वातावरण हे भ्रमनिरास करणारेअसल्याचे सांगत; शिवसेनेने भाजपवर निशाणा साधला.शिवसेना दररोज भाजपवर टीका करीत आहे. तरीही युतीचे दूत म्हणून मुनगंटीवार यांच्या खांद्यावर शिवसेनेशी चर्चा करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती, मात्र आता शिवसेनेने त्यांनाही भेट नाकारून युतीची चर्चा आता थांबवा असा अप्रत्यक्ष इशारा भाजपला दिल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT