विश्लेषण

उद्धव ठाकरेंचे sit tight.....give fight

सरकारनामा ब्यूरो

उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे. ठाकरे यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत भाषण करून सैनिकांना प्रेरीत करण्याचे काम केले. मोदी, फडवणीस, शरद पवार यांच्यावर त्यांनी टीका केली. पगडीच्या मुद्याचाही त्यांनी समाचार घेतला.

  • महाराष्ट्रामध्ये भगवा फडकवणारच - उद्धव ठाकरे
  • गेलेली सत्ता खेचून आणू पण हिंदुत्व सोडणार नाही. अशी तडजोड मी केली तर शिवराय आणि शिवसेनाप्रमुख मला माफ करणार नाहीत
  • आजच्या दिवशी आपण सदस्य नोंदणी सुरू केली आहे, मी पहिली सही केली
  • महाराष्ट्रात शिवसेना क्रमांक एकचा पक्ष करणारच
  • मोदींच्या घरावर तबकडी फिरते म्हणजे आता परग्रहावर दौरे सुरु होतील
  • गेली ५२ वर्ष असंख्य शिवसैनिकांनी अपार मेहनत घेतली, कष्ट केले. जिंकलो म्हणून माजलो नाही, आणि हरलो म्हणून थांबलो नाही
  • दहशतवादाला धर्म नसतो असं म्हणता मग रमजानमध्ये शस्त्रसंधी का केली?
  • भगवा फडकवण्याचा निर्धार केला आहे. ज्यांना त्याच्या आड यायचं आहे त्यांना सांगतो मी त्यांच्या छाताडावर बसून शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवेन
  • जम्मू काश्मीरचं सरकार नालायक आहे हे कळायला तीन वर्ष आणि ६०० सैनिकांचे बळी का जावे लागतात?
  • राजकारण करायचे असेल तर स्वत:चं डोकं वापरा, पगडी वापरू नका
  • माझी मुंबई १०७ हुतात्म्यांनी बलिदान देऊन मिळवली, त्या मुंबईतून सगळं हलवत आहे. मुंबईला मारून टाकण्याचं काम चाललं आहे
  • जनतेच्या मनामध्ये भगवा रुजवा, आपोआप भगवा महाराष्ट्रावर फडकेल
  • फक्त गायीला वाचवणं हा हिंदू धर्म नाही तर औरंगजेब सारख्या शहीद सैनिकाला मुजरा करणं हे हिंदुत्व
  •  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT