सातारा : मुस्लिम समाजाविषयी आक्षेपार्ह विधान भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी केले होते. या विधानाबद्दल उदयनराजे भोसले यांनी कराडमध्ये जाऊन मुस्लिम समाजाची माफी मागितली, पण जाताना त्यांनी 'मी सॉरी म्हणायला आलो आहे. माझी तुम्हाला शपथ आहे, असा कोणी करणारा असेल, त्याला खाली खेचा, ठेचा पण माझ्यावरती त्याचं गालबोट नको', असेही उदयनराजे म्हणाले.
लोकसभा निवडणुकीवेळी भाजप जिल्हाध्यक्षाने कराडमधील प्रचारसभेत मुस्लिम समाजाबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे उदयनराजे भोसले यांनी माफी मागितली. इतकंच नाही तर त्या प्रचारसभेवेळी जर आपण उपस्थित असतो तर भाजप जिल्हाध्यक्षाला खाली खेचलं असतं, असंही उदयनराजे म्हणाले.
उदयनराजे यांनी पोटनिवडणुकीतील पराभवानंतर पुन्हा भेटीगाठी सुरु केल्या आहेत. त्यांनी कराड शहरात जाऊन मुस्लिम समाजाची माफी मागितली. इतकंच नाही तर त्या प्रचारसभेवेळी जर आपण उपस्थित असतो, तर भाजप जिल्हाध्यक्षाला खाली खेचलं असतं, असंही उदयनराजे म्हणाले.
मुस्लिम समाजाच्या कराड येथील मेळाव्यात उदयनराजे म्हणाले, “माफी मागताना सुद्धा लाज वाटते. जे मी केलं नाही, दुसऱ्याने केलं, तरीही मी माफी मागतो. त्यांचा मतितार्थ एवढाच की समाज एकत्र राहायला हवा. भाजप जिल्हाध्यक्ष माझ्या प्रचारात नव्हते, सांगता सभेत त्यांनी माझ्या प्रचारात येऊन सर्व कामावार विरजण टाकलं. मी त्या सभेत असतो तर सभेतून खाली खेचलं असतं. सातारा जिल्ह्यातील लोकांना माझी गरज असती तर मी घसरगुंडीवरुन खाली गेलो नसतो'' असंही उदयनराजे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.