राष्ट्रवादीच्या 'शिवस्वराज्य' यात्रेत सहभागी होणार नाही : उदयनराजे
राष्ट्रवादीच्या 'शिवस्वराज्य' यात्रेत सहभागी होणार नाही : उदयनराजे 
विश्लेषण

राष्ट्रवादीच्या 'शिवस्वराज्य' यात्रेत सहभागी होणार नाही : उदयनराजे

सरकारनामा ब्युरो

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काढलेल्या शिवस्वराज्य यात्रेत सहभागी होणार नसल्याचे पक्षाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सांगितले.

ही यात्रा जाहीर करताना उदयनराजे हे स्टार प्रचारक असतील, असे राष्ट्रवादीने जाहीर केले होते. मात्र त्यासंबंधी उदयनराजेंची संमती घेतलेली नव्हती. शिवस्वराज्य यात्रा ही शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. त्या यात्रेत उदयनराजेंनी दुय्यम स्थान स्विकारणे शक्य नव्हते. ही यात्रा उदयनराजेंशिवाय सुरू झाली. त्यानंतरच उदयनराजेंशी भाजपने संपर्क वाढवला व ते भाजपच्या वाटेवर आहे. 

आज साताऱ्यात पत्रकारांनी यासंबंधाने उदयनराजेंना विचारले. राष्ट्रवादीची यात्रा साताऱ्यात येत आहे, तुम्ही सहभागी होणार का, या प्रश्नावर त्यांनी मी लई यात्रा बघितल्या आहेत. आमची स्वतःची जत्रा असताना आम्ही कश्याला त्यामध्ये सहभागी व्हायचे, असा प्रश्न त्यांनी केला. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT