BJP 

 

Sarkarnama

विश्लेषण

भाजपला लवकरच दे धक्का ! केंद्रीय मंत्र्यांसह 9 आमदार पक्ष सोडण्याच्या वाटेवर

भाजपच्या (BJP) राज्य कार्यकारिणीत डावलल्याने नाराज असलेले हे नेते लवकरच पक्ष सोडणार आहेत.

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये भाजपमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. मागील महिन्यांत पक्षाच्या 9 आमदारांनी व्हॉट्सअॅप ग्रुपमधून एक्झिट घेतली होती. यानंतर आता केंद्रीय मंत्री शंतनू ठाकूर (Shantanu Thakur) यांनी पक्षाच्या अधिकृत व्हॉट्सअॅप ग्रुपमधून एक्झिट घेतली आहे. यामुळे पक्षात मोठी खळबळ उडाली आहे. पक्षाच्या राज्य कार्यकारिणीत डावलल्याने नाराज असलेले हे नेते लवकरच पक्ष सोडणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

पश्चिम बंगालमधील (West Bengal) विधानसभा निवडणुकीतील पराभवापासून भाजपला गळती लागली आहे. आता भाजपच्या (BJP) केंद्रीय मंत्र्यांसह 9 आमदार तृणमूल काँग्रेसच्या (TMC) वाटेवर असल्याचे समोर येत आहे. ते लवकरच भाजपला रामराम करुन तृणमूलमध्ये दाखल होतील, अशी शक्यता आहे. हे आमदार भाजपमध्ये नाराज असून, ते पक्षाच्या अधिकृत व्हॉट्सअॅप ग्रुपमधून डिसेंबर महिन्यात बाहेर पडले होते. यातील बहुतांश आमदार हे मटुआ समाजातील असून, आता केंद्रीय राज्यमंत्री ठाकूर यांनीही या आमदारांचे अनुकरण केले आहे.

पश्चिम बंगाल भाजपचा अधिकृत व्हॉट्सअॅप ग्रुप ठाकूर यांनी सोडला आहे. यामुळे राज्य तसेच, केंद्रीय पातळीवर भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. हा ग्रुप अनावश्यक झाला होता, त्यामुळे मी तो सोडला, अशी भूमिका ठाकूर यांनी घेतली आहे. मी आता काही बोलणार नाही, योग्य वेळी कृती करेन, असा सूचक इशारा ठाकूर यांनी दिला आहे. ठाकूर मटुआ समाजातील प्रभावशाली नेते आहेत.ऑल इंडिया मटुआ महासंघाशी ते निगडित आहेत. त्यांनी आधी अनेक वेळा नागरिकत्व दुरुसीत कायद्याच्या अंमबजाबवणीला होत असलेल्या विलंबाबद्दल सरकारचे कान टोचले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील वर्षी केलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात ठाकूर यांना मंत्रिपद मिळाले होते. ठाकूर हे बंदर आणि जलमार्ग मंत्रालयाचे राज्यमंत्री आहेत.

भाजपने केंद्रीय मंत्रिमंडळातून डच्चू देताच बाबुल सुप्रियो यांनीभाजपला धक्का देत तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये वगळण्यात आल्याने ते नाराज होते. त्यानंतर काही दिवसांतच त्यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला. त्यांनी भाजपच्या तिकिटावर मिळालेली खासदारकीही सोडली आहे. सुप्रियो हे भाजप सोडून तृणमूलमध्ये प्रवेश करणारे ते पाचवे नेते ठरले होते. त्यांच्या आधी 4 भाजप आमदारांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला होता. सुप्रियो यांच्याकडे केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचे राज्यमंत्रिपद होते. त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास सांगण्यात आले होते. यानंतर दोनच महिन्यांत त्यांनी तृणमूलमध्ये प्रवेश करुन भाजपला धक्का दिला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT