Uttar Pradesh Lok Sabha elections 2024 Sarkarnama
विश्लेषण

Uttar Pradesh Politics: मुस्लिम मतांचे विभाजन करून भाजपला पुन्हा एकहाती सत्ता मिळेल का?

Uttar Pradesh Lok Sabha elections 2024: गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ६२ तर, त्यांचा मित्र पक्ष असलेल्या अपना दलाने दोन जागा जिंकून सप-बसप-काँग्रेसला धूळ चारली होती. बसपला १० जागा मिळाल्या होत्या.

सरकारनामा ब्यूरो

उत्तर प्रदेशातून (Uttar Pradesh Politics) दिल्लीच्या सत्तेचा रस्ता जातो. उत्तर प्रदेशात लोकसभेचे ८० मतदारसंघ (Uttar Pradesh Lok Sabha elections 2024) आहेत. ८० मतदारसंघ मिळून १५.३४ कोटी पात्र मतदार आहेत. मुस्लिम मतांची अधिक टक्केवारी उत्तर प्रदेशात आहे.

मुस्लिम मतांचे (Muslim voters) पुन्हा एकदा विभाजन करून भाजपला एकहाती सत्ता मिळेल का? याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. यंदा मुस्लिमांचे एकगठ्ठा मतदान झाले तरच सप व काँग्रेसला यश मिळेल, अशी परिस्थिती आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ६२ तर, त्यांचा मित्र पक्ष असलेल्या अपना दलाने दोन जागा जिंकून सप-बसप-काँग्रेसला धूळ चारली होती. बसपला १० जागा मिळाल्या होत्या. समाजवादी पक्षाला पाच आणि काँग्रेसला दोन जागांवर समाधान मानावे लागले होते. मुस्लिम मतांची अधिक टक्केवारी असलेल्या राज्याच्या पश्‍चिम भागात त्यांना चांगले यश मिळाले होते. या लोकसभेच्या निवडणुकीत मात्र राजकीय समीकरणे बदलली आहेत.

मुस्लिमांच्या प्रश्‍नांवर मागील तीन ते चार वर्षांपासून समाजवादी पक्षाने कुठलीही भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे बहुसंख्य मुस्लिम मतदार समाजवादी पक्षावर नाराज आहेत. यंदा बसपाने एकला चलो रे नारा देत लोकसभा रिंगणात स्वतंत्रपणे लढत आहे.

बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी अनेक मतदारसंघात मुस्लिम उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे या मतदारसंघात मतविभाजन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषत: रामपूर, मुरादाबाद, संभल याशिवाय पश्‍चिम उत्तर प्रदेशमधील इतर मतदारसंघांकडे सर्वांचे लक्ष आहे.

जाट समाजाची मते भाजपच्या बाजूने जाण्याची दाट शक्यता आहे. मागील निवडणुकीपेक्षा यंदा भाजपला अधिक जागा मिळणार असल्याचा अंदाज राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केला आहे, समाजवादी पक्षाने ही शक्यता फेटाळून लावली आहे. मुस्लिम समाज आमच्या पाठीशी असल्याची खात्री पक्षाच्या नेत्यांना आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीत आघाडी केली होती. यंदा मात्र स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. पश्‍चिम भागात प्रभाव असलेल्या राष्ट्रीय लोक दलाने भाजपला साथ दिली आहे. सप आणि काँग्रेस मात्र एकत्रितपणे लढत आहे.

२०१९ च्या निवडणुकीत या भागातील एकूण मतदारसंघांपैकी चार ठिकाणी ‘बसप’ने विजय मिळविला होता, तर तीन ठिकाणी ‘सप’ला यश मिळाले होते. मुझफ्फरनगर, कैराना, मेरठ, बुलंदशहर, बागपत आणि अलिगड या ठिकाणी भाजपला मतविभाजनाचा फायदा झाला होता.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT