Sasikala  
विश्लेषण

अण्णाद्रमुक ताब्यात घेण्यासाठी शशिकलांनी टाकलं पहिलं जोरदार पाऊल

शशिकलांनी आता कमबॅक केले असून, अण्णाद्रमुकच्या सुवर्णमहोत्सवात त्यांनी स्वत:ला पक्षाचे सरचिटणीस घोषित केले आहे.

सरकारनामा ब्युरो

चेन्नई : तमिळनाडूच्या (Tamil Nadu) माजी मुख्यमंत्री जयललिला (Jayalalithaa) यांच्या निकटवर्ती सहकारी व्ही.के.शशिकला (V.K.Sasikala) यांनी राजकारणासह सार्वजनिक जीवनातून निवृत्ती घेतली आहे. परंतु, शशिकलांनी आता कमबॅक केले आहे. अण्णाद्रमुकच्या (AIADMK) सुवर्णमहोत्सवानिमित्त त्यांनी स्वत:ला पक्षाचे सरचिटणीस घोषित केले आहे. त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे पक्षातील नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.

जयललिता या पुन्हा एकदा पक्ष ताब्यात घेण्याच्या दिशेने पावले टाकत आहेत. त्यांना पक्षातून मिळणारा पाठिंबा वाढू लागला आहे. यातच आज त्यांनी एकप्रकार शक्तिप्रदर्शन करीत कमबॅकचे संकेत दिले आहेत. पक्षाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त त्यांनी पभाचे संस्थापक व माजी मुख्यमंत्री एम.जी.रामचंद्रन यांच्या स्मारकाच्या ठिकाणी पक्षाचा ध्वज फडकावला. तेथे एका कोनशिलेचे अनावरणही शशिकलांनी केले असून, त्यावर त्यांचा उल्लेख पक्षाच्या सरचिटणीस असा करण्यात आला आहे. यातून त्यांनी माजी मुख्यमंत्री ओ.पनीरसेल्वम आणि के.पलानीस्वामी या दोन्ही गटांना इशारा दिल्याचे मानले जात आहे.

विशेष म्हणजे अण्णाद्रमुक पक्षाचा सुवर्णमहोत्सव साजरा होण्याच्या एक दिवस आधी आधीच अण्णाद्रमुकचा ध्वज लावलेल्या मोटारीतून शशिकला या मरिना बीचवर पोचल्या होत्या. त्यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले होते. त्यांना जयललितांसोबत माजी मुख्यमंत्री एम.जी.रामचंद्रमन आणि अण्णादुराई यांच्या स्मारकालाही भेट देऊन आदरांजली वाहिली. त्यावेळी मोठ्या प्रमाणात अण्णाद्रमुकचे कार्यकर्ते उपस्थित होते. शशिकला या पुन्हा राजकारणात सक्रिय होत असल्याचे संकेत त्यांना दिले होते, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. शशिकला यांनी 3 मार्चला राजकारणातून निवृत्ती घेतली होती.

एमजीआर आणि जयललिता हे कार्यकर्ते आणि पक्षाला वाचवतील, याचा मला विश्वास आहे. पक्षाला चांगले भविष्य आहे. माझ्या हृदयातील सर्व ओझे मी अम्मांच्या स्मृतिस्थळी उतरवून आले आहे, असे शशिकला या जयललिताच्या स्मारकाला भेट दिल्यानंतर म्हणाल्या. राज्यात द्रमुकची सत्ता येण्यास मदत केल्याचा ठपका आपल्यावर ठेवला जाऊ नये, यासाठी शशिकलांनी निवृत्तीचा निर्णय घेतल्याचे बोलले जात होते. आता त्या पुन्हा एकदा पक्षावर दावा सांगण्यास पुढे सरसावल्याचे मानले जात आहे. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी शिक्षा भोगून कारागृहातून बाहेर पडल्यानंतर शशिकलांनी जयललितांच्या स्मृतिस्थळी भेट दिली होती. त्यानंतर आज त्यांनी दुसऱ्यांदा ही भेट दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT