विश्लेषण

शेतकऱ्याला सरकारच डूबवतेय - दिलीप वळसे पाटील

सरकारनामा ब्युरो

जळगाव : कर्जमाफी दिली तर त्यांचा फायदा शेतकऱ्यांना होणार नाही, तर सहकारी बॅंकाना होईल. हा राज्यशासनाचा अजब तर्क आहे. सहकारी बॅंका या राजकारण्यांच्या कुटुंबांच्या नाहीत तर शेतकऱ्यांच्या आहेत. त्यामुळे कर्जमाफी दिली तर बॅंकांचा नव्हे तर शेतकऱ्यांचाच फायदा होणार आहे. मात्र शासनाचे धोरण पिकविणाऱ्या शेतकऱ्याला डुबविण्याचे आहे. असा आरोप राज्याचे माजी विधानसभा अध्यक्ष व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते दिलीप वळसेपाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. 
राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे दुसऱ्या टप्प्यातील संघर्ष यात्रा आजपासून सुरू झाली आही. ती जळगाव येथे येत आहे. त्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ.सतीश पाटील उपस्थित होते. यावेळी बोलताना वळसेपाटील म्हणाले, की उत्तर प्रदेशसह शेजारच्या चार राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यात आली आहे. उद्योगपतीनाही मदत केली जात आहे. परंतु शेतकऱ्यांना मदत करण्याच्या बाबतीत मात्र राज्य शासन उदासीन आहे., शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली तर सहकारी बॅंकांना पर्यायाने कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राजकारण्यांचा फायदा होईल असे त्यांना वाटते. राज्यातील सहकारी बॅंकांकडे बघण्याचा दृष्टिकोनही शासनाचा चुकीचा आहे. राज्यातील सहकारी बॅंका या राजकारण्यांच्या नाहीत, त्या शेतकऱ्यांच्या आहेत हे सरकारने प्रथम लक्षात घेतले पाहिजे. शेतकरी कर्जमाफी हा आमचा व्यक्तिगत अजेंडा नाही, अडचणीतील शेतकऱ्यांना मदत व्हावी हा त्या मागचा विचार आहे. आम्ही दोन वर्षापासून सभागृहात मागणी करीत आहोत, परंतु शासन आमचे ऐकून घेण्यास तयार नाही, त्यामुळे आम्ही आता रस्त्यावर उतरून संघर्ष करीत आहोत. आतातरी शासनाने जागे होऊन ताबडतोब कर्जमाफी करावी. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT