विश्लेषण

आंबेडकर-ओवेसींची आघाडी उदयनराजेंसाठी काही अटी घालणार!

सरकारनामा ब्युरो

सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांनी ऍट्रॉसिटी कायदा रद्द करावा, अशी भुमिका घेतली होती. त्यामुळे निवडणुकीत कॉंग्रेस, राष्ट्रवादी सोबत आघाडी झाली तरी साताऱ्यात ऍट्रॉसिटी व संभाजी भिडे गुरूजींच्या मुद्‌द्‌यावर आमचा उदयनराजेंना टोकाचा विरोध राहणार आहे, असे मत भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत यांनी व्यक्त केले. 

वंचित बहुजन आघाडीची सत्ता संपादन निर्धार सभा येत्या शुक्रवारी (ता. 25) येथील गांधी मैदानावर दुपारी तीन वाजता होणार आहे. यासभेत ऍड. प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे खासदार असुदुद्दीन ओवेसी हे मार्गदर्शन करणार आहेत,  

वंचित बहुजन आघाडी राष्ट्रवादी व कॉंग्रेसशी आघाडी करत आहे. सातारा लोकसभेची जागा राष्ट्रवादीकडे आहे. येथील विद्यमान खासदार उदयनराजेंनी ऍट्रॉसिटी कायदा रद्द करावा, अशी भुमिका घेतली होती. तसेच संभाजी भिडे गुरूजींची पाठराखण केली होती. तरीही तुमचा त्यांना पाठींबा राहणार का, याप्रश्‍नावर चंद्रकांत खंडाईत म्हणाले, कॉंग्रेस व राष्ट्रवादीसोबत आघाडी करताना आमच्या ही काही अटी, शर्ती असतील. तसेच आघाडी धर्म कसा पाळायचा हेही ठरवूनच आघाडी केली जाईल. पण ऍट्रॉसिटी आणि भिडे गुरूजींच्या मुद्‌द्‌यावर आमचा खासदार उदयनराजे भोसले यांना टोकाचा विरोध राहिल. यामध्ये कोणताही बदल होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT