BJP aims to counter Hitendra Thakur’s Bahujan Vikas Aghadi with a North Indian outreach plan in municipal politics. sarkarnama
विश्लेषण

Vasai-Virar Politics : हितेंद्र ठाकूरांच्या सोशल इंजिनिअरिंगला भाजपचे 'उत्तर भारतीय' कार्डचे उत्तर; प्लॅनही ठरला!

BVA VS BJP North Indian Card : मराठी विरुद्ध उत्तर भारतीय हा वाद मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तापत असताना भाजपने 'उत्तर भारतीय कार्ड' वसई-विरार महापालिकेत खेळण्याची तयारी सुरू केली आहे.

संदीप पंडित

Vasai-Virar Politics : वसई-विरार महानगरपालिकेची निवडणूक महापालिकेच्या स्थापनेनंतर प्रथमच चुरशीची होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. हितेंद्र ठाकूर यांच्या वर्चस्वाला धक्का देण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे. विधानसभेच्या निवडणुकीनंतर येथील राजकीय गणिते बदलली आहेत. यापूर्वी वसई तालुक्यातील तीनही मतदारसंघात बहुजन विकास आघाडीचेआमदार होते. परंतु यावेळी तीनही जागा या विरोधकांकडे गेल्याने ही निवडणूक बहुजन विकास आघाडीची ('बविआ') परीक्षा घेणारी ठरणार आहे.

बहुजन विकास आघाडीला आत्तापर्यंत यश मिळत आले त्यामागचे महत्त्वाचे कारण म्हणजे सोशल इंजनिअरिंग. हितेंद्र ठाकूर यांनी सर्व समाज घटकांन स्थान देत दाक्षिणात्य, उत्तर भारतीय, मराठी सर्वांना स्थान देत आपली ताकद वाढवली होती. मात्र, विधानसभेला त्यांच्या झालेल्या पराभवामुळे आता वसई-विरारमधील राजकीय गणितं बदलत आहे.

मराठी विरुद्ध उत्तर भारतीय हा वाद मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तापत असताना भाजपने 'उत्तर भारतीय कार्ड' वसई-विरार महापालिकेत खेळण्याची तयारी सुरू केली आहे. विधानसभेला उत्तर भारतीय मतदारांचा मोठा पाठींबा भाजपला मिळाला होता. त्याच जोरावर पुन्हा उत्तर भारतीयांना आकर्षित करण्यासाठी भाजप वसई-विरारमध्ये रणनीती आखत आहे.

वसई-विरार महापालिकेच्या स्थापनेपासून पालिकेवर बहुजन विकास आघाडीची एकहाती सत्ता राहिली आहे. वसई तालुक्यात बविआची गेली 35 वर्ष वर्षांपासून एकहाती सत्ता होती. त्यामुळे पंचायत समिती, जिल्हापरिषद, तत्कालीन नगरपरिषद आणि आता महापलिकेत त्यांना कोणाचे आव्हान नव्हते. प्रवीण शेट्टी, रुपेश जाधव, नारायण मानकर यांना महापौर करत बविआने दक्षिणात्या, दलित आणि आग्री समाजाला नेतृत्वाची संधी दिली होती.

भाजपचे दोन आमदार

विधानसभेत बविआच्या सर्व जागांवर प्रभाव झाल्याने महापालिका निवडणुकीत त्याचा फटका त्यांना बसण्याची चर्चा आहे. तर दुसऱ्या बाजुला वसईतील तीन पैकी दोन जागांवर भाजपचे आमदार निवडून आले आहेत तर एका जागेवर शिवसेनेचा आमदार विजयी झाला आहे. त्यामुळे बविआसाठी आणि ठाकूरांच्या राजकीय अस्तित्वासाठी ही निकराची लढाई असणार आहे.

बविआ-भाजप थेट लढत

बविआने नगरपालिकेत दक्षिण भारतीय, मुस्लिम , उत्तर भारतीय, गुजराती, आगरी , दलित ओबीसी उमेदवारांना नगराध्यक्ष पदे दिली होती. तर महानगरपालिकेत ओबीसी, दलित, गुजराती, दाक्षिणात्य नागरिकांना पदे देत सोशल इंजिनिअरिंग केले. त्यामुळे गुजराती आणि भाजपचे उत्तर भारतीय कार्ड मविआच्या रणनीतीला कशी टक्कर देईल त्यावरच महापालिका निवडणुकीचे निकाल अवलंबून आहे. भाजप आणि बविआमध्ये थेट लढत होण्याची शक्यता आहे. शिवसेनेची येथे थोडी ताकद होती. शिंदेंची शिवेसना भाजपसोबत युती करण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT