vhp leader champat rai will not resign due alleged ram mandir land deal 
विश्लेषण

चंपत राय यांच्यावर संघ नेतृत्व नाराज पण मिळालं तात्पुरतं अभय

राम मंदिर बांधकामाचा सारा व्यवहार विश्व हिंदू परिषद पहात असल्याने या संघटनेचे महामंत्री चंपत राय यांच्यावर संघाची नाराजी झाली आहे.

मंगेश वैशंपायन

नवी दिल्ली : अयोध्येतील (Ayodhya) राम जन्मभूमी ट्रस्टमधील कथित जमीन गैरव्यवहाराचा मुद्द्यावर चित्रकूट येथे झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) पाच दिवसांच्या मंथनात विस्ताराने चर्चा झाली. या प्रकरणी संघपरिवार व केंद्र सरकारचे सर्वेसर्वा नेतृत्व यांच्या प्रतिमेला हादरा बसल्याचे संघाच्या नेतृत्वाचे मत आहे. राम मंदिर बांधकामाचा सारा व्यवहार विश्व हिंदू परिषद पहात (VHP) असल्याने या संघटनेचे महामंत्री चंपत राय (Champat Rai) यांच्यावर संघाची नाराजी झाली आहे.

राम जन्मभूमी ट्रस्टच्या जमिनीच्या खरेदीत कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. याची कागदपत्रेच समोर आल्याने उत्तर प्रदेशाच्या कळीच्या निवडणुकीच्या काळात भाजप व संघपिरवार बॅकफूटवर गेला आहे. या प्रकरणी विश्व हिंदू परिषदेच्या वतीने व्यवस्थितपणे बाजू मांडली नसल्याचे संघाच्या वरिष्ठ नेत्यांचे मत आहे. राय यांनी हे प्रकरण व्यवस्थित न हाताळल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. यामुळे त्यांच्यावर टांगती तलवार आहे. केवळ उत्तर प्रदेशातील निवडणुकांमुळे सध्या राय यांना जीवदान देण्याचा संघाचा विचार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

चंपत राय यांना चित्रकटूला बोलावून घेऊन त्यांची बाजू मांडण्यास सांगण्यात आले होते. त्यांनी दिलेल्या स्पष्टीकरणामुळे संघनेतृत्वाचे समाधान झालेले नाही. या प्रकरणाच्या झळा  थेट भाजपच्या सर्वेसर्वा नेतृत्वापर्यंत जाऊन पोहोचल्या आहेत. या प्रकरणात सत्ता मिळवून देण्याची क्षमता असलेला एकमेव नेतृत्वाच्या प्रतिमेही धक्का पोहोचू शकतो, अशी भीती संघपरिवाराचा वाटत आहे. ब्रँड मोदीला धक्का बसल्यास भाजप काय उपाय करतो हे 11 केंद्रीय मंत्र्यांच्या एका फटक्यात झालेल्या हकालपट्टीतून समोर आले आहे. 

चंपत राय यांना विश्व हिंदू परिषदेच्या महामंत्रीपदावर कायम पदावर ठेवले तर भ्रष्टाचाराचे आरोप सुरू राहणार. त्यांना तातडीने हटविल्यास मंदिराच्या कामात भ्रष्टाचार झालाच्या पुरावा देणारा प्रतीकूल संदेश उत्तर प्रदेशासह देशभरात जाणार, अशी दुहेरी कात्रीत संघ नेतृत्व सापडले आहे. त्यामुळे राय यांना तूर्तास जीवदान दिले जाण्याची शक्यता आहे. मात्र, या काळात राय व परिषदेने राममंदिराबाबत कोणतेही व्यवहार करू नयेत, असे बंधनही संघाने घातले आहे. राय यांनी प्रसारमाध्यमांशी या विवादावर बोलू नये, अशी ताकीद त्यांना देण्यात आली आहे. उत्तर प्रदेशाच्या निवडणुकीपर्यंत राय यांना अभयदान मिळाले आहे. मात्र, राममंदिर जमीन खरेदी गैरव्यवहाराचा मुद्दा प्रचारात गाजू लागल्यास राय यांना तातडीने हटविण्यात येणार आहे. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT