Madhav Bhandari Sarkarnama
विश्लेषण

Madhav Bhandari: पाच दशकापासून निष्ठावंत असलेल्या संघ परिवारातील जुन्या नेत्याला BJPने डावलले; 'त्या'पोस्टची आठवण

Vidhan Parishad Election 2025 BJP Denies Ticket to Madhav Bhandari: विधान सभा, विधान परिषद, राज्यसभा निवडणुकीच्या वेळेस आत्तापर्यंत किमान बारा वेळा त्यांचे नाव उमेदवारीसाठी चर्चेत आहे, पण ऐनवेळेस त्यांचे तिकीट कापले जात, असा आत्तापर्यंतचा इतिहास आहे.

Mangesh Mahale

Madhav Bhandari News: भाजपचे ज्येष्ठ नेते माधव भंडारी यांच्या नशिबी कायम अपेक्षा आली असल्याचे दिसते. विधान परिषदेसाठी भाजपने त्यांचा पत्ता कट केला आहे. पाच दशकाहून अधिक काळ पक्षाशी निष्ठावंत असलेल्या माधव भंडारी यांना भाजपने का डावलले यांची चर्चा आज भाजपने जाहीर केलेल्या तीन उमेदवारांच्या नावानंतर पुन्हा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

जनसंघ ते भाजप असा भंडारी यांचा राजकीय प्रवास आहे, विधानसभा, विधान परिषद, राज्यसभा निवडणुकीच्या वेळेस आत्तापर्यंत किमान बारा वेळा त्यांचे नाव उमेदवारीसाठी चर्चेत होते, पण ऐनवेळेस त्यांचे तिकीट कापले जाते, असा आत्तापर्यंतचा इतिहास आहे. याबाबत त्यांचे सुपुत्र चिन्मय भंडारी यांनी निराश होऊन वर्षभरापूर्वी समाज माध्यमांवर पोस्ट शेअर केली होती. या पोस्टची यानिमित्ताने पुन्हा चर्चा होत आहे.

येत्या 27 मार्चला विधान परिषदेचे रिक्त पाच जागांसाठी निवडणूक आहे. यासाठी भाजपच्या वाट्याला तीन जागा आहेत. भाजपने दादाराव केचे, संजय केनेकर, संदीप जोशी यांना उमेदवारी दिली आहे. दोन दिवसापूर्वी भाजपने काही नावे दिल्ली दरबारी पाठवली होती. यात भंडारी यांचे नाव होते, त्यांना उमेदवारी मिळणारच, असे बोलले जात होते. पण अंतिम यादीत त्यांचा नावाला केराची टोपली दाखवण्यात आली. त्याचे तिकीट नाकारल्याची पुनरावृत्ती झाली आहे.

माधव भंडारी सारख्या ज्येष्ठ निष्ठावंत नेत्यांची विधान परिषदेची संधी हुकल्याने भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. भंडारी यांचे सुपुत्र चिन्मय यांची पोस्ट पुन्हा आठवली आहे. 'माझ्या आयुष्यात 12 वेळा मी त्यांचे नाव विधानसभेसाठी किंवा वरच्या सभागृहासाठी चर्चेत आलेले पाहिले आहे. आणि 12 वेळा, ते अंतिम झाले नाही. मी नेतृत्वाला प्रश्न विचारण्याच्या किंवा न्याय देण्याच्या कोणत्याही स्थितीत नाही. मला ते करायचंही नाही. कारण माझ्या वडिलांप्रमाणे माझाही त्यांच्यावर विश्वास आहे.', असे देखील चिन्मय यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते.

27 तारखेला मतदान व मतमोजणी 20 मार्च ही अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. त्यानंतर 27 मार्च रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत निवडणूक होईल. त्यानंतर सायंकाळी 5 वा. लगेचच मतमोजणीला सुरुवात होऊन रात्री उशिरापर्यंत निकाल जाहीर होतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT