dhas Mete
dhas Mete 
विश्लेषण

विनायक मेटे - सुरेश धसांच्या समर्थकांना हवय विरोधी पक्षनेतेपद

दत्तादेशमुख

बीड : मागच्या टर्मला धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाची संधी मिळाली. आता शिवसंग्रामचे संस्थापक आमदार विनायक मेटे आणि भाजपचे आमदार सुरेश धस या दोघांपैकी एकाला हे पद मिळू शकते असा विश्वास त्यांच्या समर्थकांना आहे.

दोघांच्याही समर्थकांकडून त्यांच्या जमेच्या बाजू आणि विश्वास समाजमाध्यमांतून व्यक्त होत आहे.

भाजपने मागच्या वेळी सत्तेपासून उपेक्षित ठेवल्याने आता विरोधात तरी संधी द्यावी, अशी विनायक मेटे आणि शिवसंग्रामच्या समर्थकांना अपेक्षा आहे. मागच्या वेळी महायुतीतील शिवसेना, रासप, रयतक्रांती, रिपाईं या सर्वच पक्षांच्या नेत्यांना मंत्रीपदे मिळाली. केवळ विनायक मेटे यांना या संधीपासून दुर रहावे लागले. त्यामुळे आता विरोधात तरी पद द्यावे, असे समर्थकांना वाटत आहे.

सध्याच्या सभागृहात आमदार विनायक मेटेंची सदस्यपदाची सिनिऑरिटी  सर्वाधिक आहे. मेटे विधान परिषदेचे पाचव्यांदा सदस्य आहेत. मेटे भाजपचा घटकपक्ष असलेल्या शिवसंग्रामचे नेते असले तरी ते भाजपच्या उमेदवारीवर सदस्य आहेत. त्यांच्या या तीन जमेच्या बाजू समर्थक पुढे करत आहेत. 

तर, सुरेश धस परिषदेत प्रथमच आमदार असले तरी त्यांच्या आमदारकीची ही चौथी टर्म आहे. आक्रमक भाषण, विरोधकांच्या अंगावर तुटून जाण्याची पद्धती आणि विरोधकांची नक्कल करण्यात माहिर असलेल्या सुरेश धसांना विधानसभा निवडणुकीत प्रचाराला मराठवाड्यातून मोठी मागणी होती. अनेक वर्षे राष्ट्रवादीत राहील्याने त्यांना विरोधकांच्या अनेक गुंड्याही माहित आहेत. 

तर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या आक्रमक शैलीचे कौतुक करत ‘तुम्ही फक्त सुरेश धसांना निपटा’ असे आवाहन तत्कालिन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना दिले होते. अलिकडे फडणवीसांची धसांवरील वाढलेली मर्जीही त्यांची जमेची बाजू मानली जात आहे. सत्ताबदल झाला असला तरी पुन्हा हे पद जिल्ह्याला मिळते का याकडे लक्ष लागले आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT